Priyanka chopra Instagram
मनोरंजन

Priyanka Chopra: 'माझ्या आयुष्यात आलेले काही पुरुष जे नेहमीच..', हैराण करणारा खुलासा करत प्रियंकानं उडवली खळबळ

प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड संदर्भातील तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Priyanka chopra: बॉलीवूड ते हॉलीवूडचा प्रवास करत यशाच्या शिखरावर पोहोचलेली प्रियंका चोप्रा सध्या खूप चर्चेत असलेली पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी प्रियंकानं बॉलीवूडमधील राजकारणावर हैराण करणारे खुलासे केले होते.

आता तिनं स्त्री-पुरुष मानधनाच्या आकड्यातील समानता आणि आपल्या वैयक्तिक अनुभवाविषयी बोलताना खुलासा केला आहे की ती काही अशा पुरुषांना ओळखते ज्यांच्या मनात तिच्या यशानं असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

अर्थात यावेळी प्रियंकानं हे देखील आवर्जुन नमूद केलं की ती काही अशा पुरुषांना देखील ओळखते जे तिच्या यशानं खूश आहेत. (Priyanka Chopra Opens up on pay parity says i know men who are insecure of my success)

प्रियंका चोप्रा म्हणाली,''माझ्या आयुष्यात खूप चांगले पुरुष आहेत ज्यांना माझ्या यशानं आनंद होतो ना की असुरक्षित वाटतं. पण माझ्या आयुष्यात काही असे पुरुष देखील आले आहेत ज्यांना माझ्या यशानं असुरक्षित वाटायचं आणि अजूनही वाटतं''.

''म्हणून मला वाटतं की पुरुषांनी स्वातंत्र्य पुरेपूर एन्जॉय केलं आहे आणि कुटुंबाचं प्रमुख असल्याकारणानं प्रतिष्ठेचा देखील आनंद अनुभवला आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिष्ठेला तेव्हा धक्का पोहोचतो जेव्हा एखादी महिला त्या जागेवर येते किंवा एखादी महिला त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी होते. किंवा एखादा पुरुष घरी राहतो आणि घरातील महिला कामासाठी बाहेर पडते तेव्हा पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचते''.

प्रियंका चोप्राला आपण लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओची वेब सिरीज 'सिटाडेल' मध्ये लवकरच पाहू शकणार आहोत. २८ एप्रिल रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज स्ट्रीम केली जाईल. काही दिवसांपूर्वी प्रियंकानं मुंबईत या सीरिजचं प्रमोशन केलं होतं.

प्रियंका चोप्रा फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमातही काम करतेय. यामध्ये तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील काम करत आहेत.

या सिनेमाविषयी अपडेट देताना प्रियंका म्हणाली,''मला वाटतं की आलिया,कतरिना आणि मी..आम्ही तिघी सध्या आमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये व्यस्त आहोत. पण मला आशा आहे की, या सिनेमाचं शूटिंग पुढील वर्षी सुरू होईल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

OBC leaders ultimatum : ‘’२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा, श्वेतपत्रिका काढा’’ ; ओबीसी नेत्यांची सरकारला सहा दिवसांची मुदत!

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

ग्लोबल स्टार राम चरण याच्या हस्ते आर्चरी प्रीमियर लीगचा दणदणीत शुभारंभ

Hill Station Travel Tips: पहिल्यांदाच हिल स्टेशनला जाताय? मग ट्रॅव्हल बॅगमध्ये नक्की पॅक करा 'या' महत्वाच्या वस्तू

SCROLL FOR NEXT