priyanka chopra 
मनोरंजन

प्रियांका चोप्रा स्वतःच्याच हेअरस्टाईल आणि रॅम्पवॉकची उडवतेय टर, पाहा व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- देसी गर्ल पासून ते आंतरराष्ट्रीय स्टार बनलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलीवूडमध्ये हळूहळू तिचा पाय रोवतेय. बॉलीवूड ते हॉलीवूड असा प्रवास करणा-या प्रियांकाला हिंदी सिनेमामध्ये २० वर्ष पूर्ण झाली आहेत. आत्तपर्यंत प्रियांकाने ५० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रियांकाने तिच्या या प्रवासाची सुरुवात २००० साली फेमिना मिस इंडियाच्या ब्युटी स्पर्धेपासून केली होती. प्रियांकाने तिच्या याच वेळेच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत. प्रियांकाने तिचा स्वतःचा एक जुना व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मिडियावर शेअर केलेत.

प्रियांका चोप्रा बॉलीवूडमधील तिची २० वर्ष साजरी करतेय. यासोबंतच ती तिच्या जुन्या आठवणींमध्ये रमलीये जेव्हा तीला ब्युटी स्पर्धेत मुकुट घालण्यात आला होता. प्रियांकाने तिच्या त्यावेळच्या स्टाईल सेंस पासून ते तिच्या फोटोसाठी पोज देण्याच्या प्रत्येक गोष्टीवर मजेशीर रिऍक्शन्स दिल्या आहेत. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हे सगळं तिच्या फोनवर पाहतेय आणि हे शेअर करताना तिने साईडला ती पाहत असलेली व्हिडिओ क्लीप देखील शेअर केली आहे.

प्रियांकाने लिहिलंय, 'मी माझा २००० सालचा मिस इंडियाचा व्हिडिओ पाहत आहे जिथुन या सगळ्याची सुरुवात झाली होती. जर तुम्हा याआधी हे सगळं पाहिलं नसेल तर ही तुमच्यासाठी एक ट्रीट आहे.'

प्रियांका हा व्हिडिओ पाहताना तिच्या हेअरस्टाईवर हसताना दिसतेय. इतकंच नाही तर स्टेजवर ज्या प्रकारे ती चालतेय त्याचीही ती मस्करी करतेय. प्रियांकाने सांगितलं की त्यावेळी तिचे केस खूप चांगले होते. एवढंच नाही तर त्यावेळच्या मेकअप बद्दलही ती यात सांगत आहे. 

प्रियांकाने सांगितलं की तिला अजिबात विश्वास नव्हता की ही स्पर्धा जिंकेल. तिने तीची ट्रेन बुक केली होती आणि तिथून परतल्यावर ती बोर्डाची परिक्षा देखील देणार होती. तेव्हाच सगळं काही बदललं आणि तो मुकुट घातल्यापासून ते आजपर्यंत तीने कधी मागे वळून पाहिलं नाही.   

priyanka chopra shares her femina miss india contest 2000 video and old photoshoot  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : ४०००० कोटींचे उत्पन्न... ७० लाख नोकऱ्या, गडकरींनी दिलेला कमाईचा मंत्र काय आहे?

Latest Marathi News Updates : रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी रेखाटून प्रशासनाचा निषेध

Viral: वजन कमी करा आणि पैसे मिळवा... प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर, १८ किलो वजन कमी करणाऱ्याला २,४६,८४५ रुपये दिले

Marriage Registration Issue : सहा महिन्यांपासून विवाह नोंदणी पोर्टल ठप्प; हजारो विवाहांची नोंदणी रखडली

Asia Cup 2025: भारत - पाकिस्तान सामन्यावर BCCI चा 'अदृश्य बहिष्कार'? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT