man vs wild bear grylls soon to come to india for adventure show with priyanka chopra sakal
मनोरंजन

Priyanka Chopra: साऊथ इंडियाचं माहीत नाही पण प्रियंका चोप्रा बेअर ग्रील्स बरोबर नक्की झळकणार!

'मॅन vs वाइल्ड'च्या बेअर ग्रील्स सोबत आता प्रियंकाचा थरार..

Devendra Jadhav

Priyanka Chopra with Bear Grylls : अभिनेत्री प्रियांका चोप्रा लोकप्रिय आंतरराष्ट्रीय स्टार झाली आहे. प्रियंका सध्या बॉलिवूडमध्ये कोणतंही काम करत नाहीये. त्यामुळे प्रियांकाचे भारतीय फॅन्स तिच्या अभिनयाची वाट पाहत आहेत.

आता प्रियंकाच्या फॅन्ससाठी खुशखबर. प्रियंका आता लवकरच काहीतरी थरारक करताना दिसणार आहे. आता तुम्ही म्हणाल आजवर तिच्या इतक्या भूमिका पहिल्या पण.. थरारक म्हणजे नेमकं काय..

तर प्रियंका लवकरच 'मॅन व्हरसेस वाइल्ड' या एडवेंचर शो मध्ये बेअर ग्रील्स सोबत झळकणार आहे. त्यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांना हा वेगळ्याच रूपात तिला पाहता येणार आहे.

(man vs wild bear grylls soon to come to india for adventure show with priyanka chopra)

मॅन vs वाईल्ड हा शो प्रचंड लोकप्रिय असा शो. गेली अनेक वर्ष मॅन vs वाईल्ड या शोने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मॅन vs वाईल्डचा कर्ताधर्ता आहे तो म्हणजे बियर ग्रिल्स.

बियर ग्रिल्स जंगलाजंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये, काट्याकुट्यांमधून फिरत अनेक ठिकाणी आजवर गेलाय. कठीण परिस्थितीत जगायचं कसं हे तो सांगत असतो. आजवर या शोमध्ये रजनीकांत, अक्षय कुमार, रणवीर सिंग अनेक इंडियन सेलिब्रिटी आले आहेत. आता या शोमध्ये प्रियांका चोप्रा झळकणार आहे.

या विषयी जेव्हा बेअर ग्रील्सला विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, 'प्रियंका चोप्रा ही जगभरात ओळखली जाणारी एक मोठी अभिनेत्री आहे. ती जर माझ्या शो मध्ये येणार असेल तर मला आनंदच आहे आणि विशेष म्हणजे तशी ती धाडसी आहे. '

'ती प्रचंड लोकप्रिय असल्याने माझ्या शोच्या माध्यमातून तिचे आयुष्य, त्यातील किस्से प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडतील, आणि माझ्यासाठीही तो भाग एक पर्वणी असेल. '

'पुढील काही महिन्यांत मी भारतामध्ये येणार आहे, यावेळी प्रियंका सोबत शूट करण्याचा विचार आहे. परंतु अधिकृत रित्या त्याविषयी इतक्यात मी सांगू शकत नाही.'

प्रियांका चोप्राही हॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, अभिनेत्री हॉलिवूड वेब सीरिज Citadel मध्ये दिसली. या सिरीजमधील प्रियांकाचा अॅक्शन अवतार चाहत्यांना खूप आवडला होता.

याशिवाय प्रियांका हॉलिवूडमधील रोमँटिक लव्हस्टोरी 'लव्ह अगेन'मध्येही दिसली आहे. प्रियांका अनेकदा पती निक जोनाससोबत ग्लोबल इव्हेंटमध्ये दिसत असते.

काहीच दिवसांपूर्वी प्रियांका नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMAAC) च्या उदघाटनाला सहकुटुंब आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT