Priyanka Chopra ,Nick Jonas Google
मनोरंजन

प्रियंकाच्या बाळाचं नाव भारतीय की अमेरिकन?आई मधु चोप्राने केलं कन्फर्म

प्रियंका-नीक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात आई-बाबा होण्याची खूशखबर दिली.

प्रणाली मोरे

प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) आणि निक जोनस(Nick Jonas)ला सरोगसीच्या माध्यमातून कन्या रत्नाचा लाभ झाला आहे. प्रियंकानं स्वतः याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. प्रियंकानं अद्याप मुलीविषयी कोणतीही अधिक माहिती सांगितलेली नाही. परंतु,आता प्रियंकाची आई मधु चोप्रानं आपल्या नातीविषयी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. नुकतंच,मधु चोप्रा यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या संभाषणातून आपल्या नातीविषयी प्रेम व्यक्त केलं. हा कार्यक्रम मधु चोप्रा यांच्या क्लिनिकला १४ वर्ष झाल्याच्या निमित्तानं आोजति केला होता.

मधु चोप्रा म्हणाल्या की,''मी आजी झाले आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे. माझ्या नातीचा जन्म झाल्यापासून ते या क्षणापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण आले आहेत. माझ्या चेहऱ्यावर कायम हसू ठेवण्यात माझ्या नातीचा मोठा वाटा आहे''. जेव्हा मधु चोप्रा यांना प्रियंकाच्या मुलीचं नाव काय आहे याविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या,''पंडितजी नाव पत्रिका पाहून काढतील. तेव्हाच ते आम्ही ठेऊ. म्हणजे यावरनं तर नक्की कन्फर्म होतंय की मुलीच नाव प्रियंका भारतीयच ठेवणार. प्रियंकानं आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळेस केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की,''आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की,मी आणि निक सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झालो आहोत. आता आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करीत आहोत. आम्हाला आमचा हा खास वेळ एन्जॉय करायचा आहे. धन्यवाद''.

प्रियंकानं काही दिवसांपूर्वीच मुलीच्या खेळण्याची रुम दाखवत काही फोटो पोस्ट केले होते. त्यातील टेडी बिअरसोबतच बाळकृष्णाच्या मूर्तीनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. सध्या प्रियंका 'द मैट्रिक्स रिसरेक्शन' या हॉलीवूडपटात आपल्याला दिसली होती. लवकरच ती बॉलीवूड सिनेमाचं शूटिंग करायलाही सुरुवात करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

दहावीला शाळेत पहिला नंबर आला, विद्यार्थीनीचा सत्कार करायला घरी गेले; कौतुक करतानाच शिक्षकाचा मृत्यू

IPL 2026 Point Table: उर्विल पटेलची ऐतिहासिक खेळी! CSK ची मोठी झेप अन् लखनौ सुपर जायंट्स प्ले ऑफच्या शर्यतीतून OUT

SCROLL FOR NEXT