puneet superstar will seen in lock up 2 kangana ranaut after bigg boss ott 2 SAKAL
मनोरंजन

Puneet Superstar: बिग बॉस मधुन हाकललं, आता पुनित सुपरस्टार दिसणार या प्रसिद्ध रिअॅलिटी शो मध्ये

Bigg Boss OTT 2 नंतर पुनित आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे

Devendra Jadhav

Puneet Superstar News: पुनीत सुपरस्टार ज्याला लॉर्ड पुनीत म्हणूनही ओळखले जातं. Bigg Boss OTT 2 मधुन पुनितला २४ तासांच्या आत त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे घरातुन हाकलण्यात आले.

Bigg Boss OTT 2 नंतर पुनित आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. पुनितने स्वतः या गोष्टीची माहिती व्हिडीओच्या माध्यमातुन स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. पुनितचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आगामी शो संबंधित अपडेट्स देताना दिसत आहे.

(Puneet Superstar will seen in lock up 2 kangana ranaut after bigg boss ott 2)

पुनित दिसणार या रिअॅलिटी शो मध्ये

पुनित Bigg Boss OTT 2 नंतर आता 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. पुनित याविषयी व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "मला सांगण्यास मनाई करण्यात आली होती, पण मी येथे घोषणा करतो. मला कोणतीही अडचण नाही. खरं तर, आता मी लॉक अपमध्ये येणार आहे. मला खूप दिवसांपासून ऑफर्स येत आहेत. पण तुम्ही लवकरच मला तिथे पाहाल." असा व्हिडीओ शेअर करत पुनितने खुलासा केला

पुनित लॉक अप 2 मध्ये कंगनाला प्रपोज करणार

लॉक अप शोची होस्ट कंगना रणौतबद्दल बोलताना पुनीत म्हणाला, "लॉक अप शोमध्ये मी एन्ट्री करेल तेव्हा कंगना जी माझ्यासमोर बसेल.. सर्वप्रथम मी म्हणेन की, कंगनाजी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुम्हीही माझ्यावर खूप प्रेम करता. आणि त्यानंतर आमच्यात प्रेम होईल.आपलं लग्न होईल आणि आपल्यासारखी 2 गोरी-गोरी मुलं जन्माला येतील.

पुनितचं इंस्टाग्राम अकाऊंट पडलं बंद

पुनीत सुपरस्टार सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जवळपास 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. पुनित त्याच्या विचित्र व्हिडिओंनी हसवतो, तर काही लोकांना त्याचे व्हिडिओ खूपच भयंकर वाटतात.

आता अलीकडे, पुनीत सुपरस्टारचे अकाऊंट इंस्टाग्रामवर दिसत नाही, ज्याचे अनेक स्क्रीनशॉट त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर देखील शेअर केले आहेत.

पुनितचे अकाऊंट बंद झाल्याने त्याचे अनेक चाहते संतापले असून पुनीतचे अकाऊंट परत आणावं म्हणुन मागणी करताना दिसत आहेत.

पुनितला बिग बॉस OTT 2 मधुन बाहेर काढलं

पुनीत सुपरस्टारला बिग बॉस OTT 2 मध्ये स्पर्धक म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर 12 तासांत पुनीतला घरातून बाहेर काढण्यात आले.

बिग बॉसच्या इतिहासात आजपर्यंत एकही सदस्य इतक्या लवकर घरातून बाहेर पडलेला नाही. हा स्वतःच एक विक्रम आहे.

पुनीतला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घरातील कुटुंबीयांच्या सामूहिक मतदानाच्या आधारे घेण्यात आला. कारण पुनीतसोबत हे सदस्य घरात राहू शकत नाही, असे सर्वांचे मत होते.

आता लॉक अप 2 मध्ये सहभागी झाल्यावर पुनितचा खेळ पहायला नक्कीच त्याच्या फॅन्सना आनंद होईल यात शंका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT