Pushpa 2 Release Date Google
मनोरंजन

Pushpa 2 Release Date: शाहरुखला बॉक्सऑफिसवर नडणार 'पुष्पा'.. अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' ची रिलीज डेट आली समोर

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' विषयी लोकांमध्ये भलतीच क्रेझ पहायला मिळतेय.

प्रणाली मोरे

Pushpa 2 Release Date: अल्लू अर्जूनचा 'पुष्पा' २०२१ साली जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा मोठा धमाका झाला होता. आणि त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची वाट सगळे पाहत होते. अधिकृतरित्या 'पुष्पा २' ची घोषणा कधीच करण्यात आली आहे. (Pushpa 2 Release Date bollywood tollywood movie allu arjun movie)

काही दिवस आधी निर्मात्यांनी पुष्पा २ चा एक टीझर व्हिडीओ आणि अल्लू अर्जूनचा एक पोस्टर रिलीज केलं होतं, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टीझर आणि पोस्टर समोर आल्यानंतर चाहते आता या सिनेमाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. आणि प्रत्येकाला या सिनेमाची रिलीज डेट जाणून घ्यायची होती.

अधिकृतरित्या पुष्पा २ ची रिलीज डेट समोर आलेली नाही पण काही मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. बोललं जात आहे की अल्लू अर्जूनचा हा सिनेमा २२ डिसेंबरला सिनेमागृहात भेटीस येईल.

आता रिलीज डेट विषयी मेकर्सनी काही सांगितलेलं नसलं तरी जर या तारखेला 'पुष्पा २' रिलीज झाला तर शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाशी 'पुष्पा २' ची टक्कर झालेली पहायला मिळू शकते. 'डंकी' सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानीचं आहे. 'डंकी' देखील डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहरुख सोबत पहिल्यांदाच तापसी पन्नू दिसणार आहे.

'पुष्पा २' विषयी अशी देखील चर्चा आहे की या सिनेमात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग देखील नजरेस पडणार आहेत. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की तो या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसू शकेल. अर्थात याविषयी देखील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कराचीत एकाच दुकानात ३० मृतदेह, आठवड्याभरापासून सुरू आहे शोधमोहीम; मृतांचा आकडा ६१वर

मुख्याध्यापकाकडूनच शिक्षिकेचा विनयभंग! साेलापुरात उडाली खळबळ, मोबाईलवर पाठवला अश्लिल व्हिडिओ; आरोपी फरार...

Mumbai Jobs 2026: 2026 मध्ये करिअर बदलायचंय? लिंक्डइननुसार मुंबईतील टॉप 10 इन‑डिमांड नोकऱ्या जाणून घ्या

Kolhapur Gokul : गोकुळ ते जिल्हा परिषद! विश्वास पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने कोल्हापुरात राजकीय भूकंप

Crime News : तीन वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट; मूल होत नसल्यामुळे पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून केला खून

SCROLL FOR NEXT