pushpa 2, pushpa 2 release date, allu arjun birthday, pushpa 2 trailer Esakal
मनोरंजन

Pushpa 2: फायर है मैं! या दिवशी दिसणार पुष्पाची झलक.. निर्मात्यांनी दिली गुडन्यूज

सकाळ डिजिटल टीम

Pushpa 2: झुकेगा नही साला म्हणताच डोळ्यासमोर येतो तो अल्लू अर्जुनचा रावडी लुक अन् फाडू डायलॉग. ज्यांनी सर्वांनाच वेड करुन सोडलं होतं. 'पुष्पा द राइज'नं बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व तर गाजवलचं त्याचबरोबर अल्लू अर्जुनला यशाच्या शिखरावर पोहचवलं. आता त्यांचे चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.

अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. चाहते या चित्रपटाविषयी अपडेट जाणुन घेण्यासाठीही उत्सुक असतात. अशा परिस्थितीत या चित्रपटासंबधित एक नवीन अपडेट समोर आली आहे, जे चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणार आहे.

'पुष्पा' चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये अजूनही जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनचा अभिनय आणि त्यांची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली. आता दुसऱ्या भागात त्यांची स्टाईल किती बदलली आहे आणि त्यांचबरोबर चित्रपटात कलाकार कोणत्या लूकमध्ये दिसणार आहेत हेही कळेलच.

सध्या इंटरनेटवर अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाची रिलीज डेट आणि टीझरची चर्चा होत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या टीझरच्या रिलीज डेट समोर आली आहे.

'पुष्पा: द राइज' चित्रपटाचे निर्माते 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या फ्रेंचायझीच्या दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज करण्यासाठी सज्ज आहेत. निर्माते चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.


हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

'पुष्पा 2 द रुल' चे नुकतेच विशाखापट्टणममध्ये शूटिंग पूर्ण केले ज्यामध्ये त्यांनी बरेच अॅक्शन सीक्वेन्स शूट केले आहेत. अल्लू अर्जुन, रश्मीका मंदाना, फहाद फाझील असे कलाकार पुष्पा 2 द रुल मध्ये दिसणार आहेत.

एका ट्विटनुसार, निर्मात्यांनी आतापर्यंत शूट केलेल्या अॅक्शन सीक्वेन्सचा तीन मिनिटांचा टीझर बनवला आहे आणि ते 8 एप्रिलला अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करत त्याच्या चाहत्यांना याची भेट दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT