Allu Arjun in Pushpa 
मनोरंजन

..तर 'पुष्पा'च्या क्लायमॅक्समध्ये असता अल्लू अर्जुनचा न्यूड सीन

दिग्दर्शक सुकुमार यांनी केला खुलासा

स्वाती वेमूल

'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या करिअरमधील पहिला आयटम साँग या चित्रपटात आहे. चित्रपटातील इतरही काही दृश्यांची चर्चा सोशल मीडियावर होतेय. अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी क्लायमॅक्सबाबत खुलासा केला आहे. 'पुष्पा: द राईज' या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अल्लू अर्जुन आणि फहाध फासिल यांच्या न्यूड सीनचा विचार होता. मात्र नंतर माघार घेतल्याचं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं. 'तेलुगू प्रेक्षकांनी त्या सीनचा प्रचंड विरोध केला असता आणि परिणामी चित्रपटाला त्याचा फटका बसला असता', म्हणून क्लायमॅक्स सीनमध्ये बदल केल्याचं सुकुमार यांनी सांगितलं.

"अल्लू अर्जुन आणि फहाध यांचा क्लायमॅक्समध्ये न्यूड सीन होता. मात्र ते तेलुगू प्रेक्षकांच्या विरोधात गेलं असतं", असं सुकुमार म्हणाले. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांच्या इंटिमेट सीनलाही अनेकांनी विरोध केल्याचं पहायला मिळालं. काही प्रेक्षकांनी हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचीही मागणी केली आहे.

'पुष्पा' या चित्रपटाने गेल्या नऊ दिवसांत ३२.९५ कोटी रुपयांचा (हिंदी भाषेतील कमाई) गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन 'रफ अँड टफ' लूकमध्ये पहायला मिळतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT