Pushpa Shrivalli song english version viral  
मनोरंजन

Pushpa: 'इंग्रजी' श्रीवल्लीचा कल्ला: ऐकावं असं व्हर्जन...

टॉलीवूडच्या अल्लु अर्जुनच्या पुष्पानं (Pushpa Movie) आता अटकेपार सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

युगंधर ताजणे

Tollywood News: टॉलीवूडच्या अल्लु अर्जुनच्या पुष्पानं (Pushpa Movie) आता अटकेपार सर्वोत्तम कामगिरी केली आहे. बॉलीवूडला (Bollywood News) तर या चित्रपटानं मोठा धक्का दिला होता. त्यानंतर पुष्पामधील गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकुळ घातल्याचे दिसून आले आहे. त्यातील श्रीवल्ली गाण्यानं (Shrivalli Song) आबालवृध्दापासून सर्वांना आपलंसं केलं आहे. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये या गाण्याचे व्हर्जन प्रदर्शित झाले आहे. आता सोशल मीडियावर श्रीवल्लीचे इंग्रजी व्हर्जन प्रदर्शित झाले असून त्यालाही नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. बॉक्स ऑफिसवर पुष्पानं विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले आहे. पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

(Allu Arujun pushpa Movie) श्रोत्य़ांना इंग्रजी व्हर्जन ऐकून श्रीवल्लीच्या गाण्याचे नव्यानं अप्रुव्ह वाटले आहे. डच सिंगर एमा हिस्टर्सनं (Emma Heesters) हे इंग्रजी व्हर्जन गायलं आहे. त्याचं नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे. सध्या हे गाणं यु ट्युबवर ट्रेडिंगचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीवल्ली गाण्याचे वेगवेगळया भाषांमध्ये व्हर्जन्स प्रदर्शित होताना दिसत आहे. मराठीतल्या श्रीवल्लीनं देखील मराठी श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्याचे इंग्रजी व्हर्जन हे तेलुगू मिक्स आहे. एमा ही गायिका आणि टीव्ही सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं ते गाणं यु ट्युबवर शेयर केलं असून त्याला आतापर्यत साडेपाच लाख व्ह्युज मिळाले आहेत. एमा जेव्हा गाणं सुरु करते तेव्हा ओह यू टर्न ऑफ द अदर साईड .....या ओळीनं गाणं सुरु होतं.

या गाण्याची गंमत अशी की, एमानं गायलेल्या गाण्यातील शब्दांच्या उच्चारणाची श्रोत्यांनी प्रशंसा केली आहे. भलेही गायिका परदेशी असेना का मात्र तिनं ज्या पद्धतीनं श्रीवल्लीला न्याय दिला आहे ते ऐकुन त्या कौतूकाच्या धनी असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पामध्ये रश्मिका मंदाना ही प्रमुख अभिनेत्री आहे. केवळ भारतच नाहीतर जगभरात या गाण्यानं मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT