esakal
मनोरंजन

'रानबाजार'साठी प्राजक्ता माळीने वाढवले ११ किलो वजन, आता करतीय वर्कआऊट

मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची रानबाजार या वेबसिरीजची चर्चा अधिक रंगली आहे.

धनश्री ओतारी

मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची रानबाजार या वेबसिरीजची चर्चा अधिक रंगली आहे. वेब सीरिजच्या पहिल्या टीजरपासून यामध्ये बोल्ड दृश्य दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची विशेष चर्चा रंगली आहे. अशातच प्राजक्ता माळीने त्यामधील तिच्या भूमिकेबद्दल छोटी माहिती दिली आहे.

प्राजक्ताने आपल्या इंस्टा एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं रानबाजार वेबसिरीजसाठी तिला स्वतःमध्ये काय बदल करावा लागला याची माहिती दिली आहे.

टेलिव्हिजन तसेच चित्रपटांमधून सोज्वळ भूमिका साकारणारी प्राजक्ता अशा बोल्ड भूमिकेत दिसल्याने सर्वांना आच्छर्याचा धक्का बसला. यामध्ये ही भूमिका साकारण्यासाठी प्राजक्ताला वजन वाढवण्याचे मोठं आवाहन पेलाव लागलं. तिनं केलेल्या पोस्टमध्ये '६१ किलोंवरुन ५४ किलोवर.. माझं लक्ष्य ५१ किलो असं म्हटलं आहे.

म्हणजेच प्राजक्ताचं मुळं वजन ५१ किलो होत. तिनं ११ किलो वाढवलं. पण आता ती वजन कमी करण्याची मेहनत घेत आहे. या वर्कआऊटदरम्यान तिचं वजन थोडं कमी झालं असून सध्या ५४ इतकं आहे. अशी माहिती प्राजक्ताने पोस्टमध्ये दिली आहे. अभिनेत्रीने या सर्व प्रवासासाठी तिचे आहारतज्ज्ञ, योगा प्रशिक्षक आणि होमिओपथी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

ही पोस्ट शेअर करताना प्राजक्ताने दोन फोटो शेअर केलं आहेत. यातील एक फोटो ग्लॅमरस अंदाजातील आहे. तर दुसरा फोटो रानबाजार वेबसीरीजमधील आहे.

राजबाजार या प्लॅनेट मराठीवर रीलिज झालेल्या वेब सीरिजचे पहिले पाच एपिसोड प्रदर्शित झाले असून आणखी पाच एपिसोड बाकी आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद या वेब सीरिजला मिळत असून प्राजक्ताच्या भूमिकेचे कौतुकही होत आहे. तर काहींनी तिला ट्रोलदेखील केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढणार

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

Rohit Sharma च्या मनातलं नाव जादुगारानं एकदम करेक्ट ओळखलं, हिटमॅनही झाला आवाक्; Video Viral

SCROLL FOR NEXT