Radhe Shyam Movie
Radhe Shyam Movie esakal
मनोरंजन

Radhe Shyam: तिसऱ्या दिवशीच कमावले 100 कोटी, आता टक्कर 'पुष्पाशी'

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Movies: बाहुबली फेम प्रभास (Actor Prabhas) आणि पूजा हेगडे (Actor Pooja Hegde) यांचा राधे श्याम (Radhe Shyam) आता प्रदर्शित झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा, (Bollywood Actor) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. केवळ तीन दिवसांतच या चित्रपटानं शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. अशाप्रकारे एक आगळावेगळा विक्रम आता राधे श्यामच्या नावावर आहे. शंभर कोटींच्या क्लबमध्ये (100 Core business) या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. कोरोनाचा फटकाही राधे श्यामला बसला होता. कालचा दिवस राधे श्यामसाठी मोठा होता. आता या चित्रपटानं द काश्मीर फाईल्स आणि गंगुबाईला (Gangubai Kathiyawadi) देखील मागे टाकले आहे.

मनोरंजन क्षेत्रातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राधे श्यामनं पहिल्याच दिवशी 72.41 कोटींचा बिझनेस केला होता. दुसऱ्या दिवशी 39.65 कोटींचा गल्ला जमा झाला. इतर काही रिपोर्टसच्या माहितीनुसार दक्षिण भारतामध्ये देखील राधे श्यामनं 35 कोटींचा बिझनेस केल्याचे दिसुन आले आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये प्रभासची प्रमुख भूमिका असून तो एका खास भूमिकेत आहे. हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये राधे श्यामनं चार कोटींचा व्यवसाय केला आहे. राधे श्यामला मिळालेलं यश हे निर्मात्यांच्या दृष्टीनं आनंदाची बाब मानली जात आहे. आता हा चित्रपट पुष्पाचे रेकॉर्ड ब्रेक करतो किंवा नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अल्लु अर्जुन सारखीच प्रभासचाही मोठा प्रेक्षकवर्ग बॉलीवूडमध्ये आहे.

राधे श्यामची स्टोरी ही 1970 च्या काळात घडणारी आहे. युरोपमध्ये घड़णारे हे कथानक त्याच्यातील रहस्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. हस्तरेषा तज्ञ म्हणून प्रभासनं त्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. तो एका डॉक्टरच्या प्रेमात पडतो असेही त्यात दाखवण्यात आले आहे. पूजा हेगडेनं डॉक्टर प्रेरणाची भूमिका साकारली आहे. याशिवाय भाग्यश्री, सचिन खेडेकर, जयराम, जगपति बाबु आणि मुरली शर्मा यांच्याही त्यात महत्वाच्या भूमिका आहेत. तीन वर्षानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT