radhe salman khan  Tema esakal
मनोरंजन

सलमान म्हणतो, 'जिंदगी जी है अपनी शर्तो पे, जीना कुँवारा नही मांगता'

सोशल मीडियावर सलमानच्या नव्या चित्रपटातील गाणी सध्या ट्रेंडिंगचा विषय आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खानच्या (salman khan) नवीन चित्रपटाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असते. आता सध्या त्याच्या राधे द मोस्ट वाँटेड (Radhe - Your Most Wanted Bhai) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्या आज त्या चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित झालं आहे. अल्पावधीतच त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. सलमानचं व्यक्तिमत्व या गाण्यातून मांडण्यात आली आहे. अशा कमेंट त्या गाण्याला मिळत आहेत. मोठ्या कालावधीनंतर सलमानचा चित्रपट येत असल्यानं त्याविषयी त्याच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. यापूर्वी राधेचा ट्रेलर आणि त्यातील सिटी मार नावाचे गाणे प्रदर्शित झाले होते.

सोशल मीडियावर सलमानच्या नव्या चित्रपटातील गाणी सध्या ट्रेंडिंगचा विषय आहेत. त्यात ‘सिटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ या गाण्यांचा उल्लेख करावा लागेल. जेव्हापासून दर्शकांनी ट्रेलरमध्ये टायटल ट्रॅक राधेचे (Radhe - Your Most Wanted Bhai) टीजर ऐकले आहे, चित्रपटाच्या ज्यूक बॉक्ससोबत गाण्याचे ऑडियो प्रदर्शित करण्यात आले होते त्याला देखील उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. आणि आता, सुपर एक्साइटेड फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे की चित्रपट निर्मात्यांनी 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'च्या (Radhe - Your Most Wanted Bhai) टायटल ट्रॅकचे अनावरण केले आहे. साजिद-वाजिद द्वारा रचित आणि साजिदच्या आवाजात हा एक एंटरटेनर ट्रॅक आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान आणि दिशा पटानी गाण्यातील थिरकायला लावणाऱ्या संगीतावर डांस करताना पाहता येणार आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान डैपर लुकमध्ये दिसणार असून सलमान-दिशाची जोड़ी मुख्य आकर्षण आहे.

सध्या सोशल मीडियावर सलमानचे जे गाणं व्हायरल झाले आहेत त्यात सलमान खान स्टाइल एंटरटेनमेंटचे ते प्रत्येक गुण आहेत जे चाहत्यांच्या पसंतीस पडणार आहेत. सलमानचा या गाण्यातील लुक डॅशिंग असून हा ट्रॅक चित्रपटातील राधेच्या व्यक्तिरेखेला हुबेहूब सादर करतो आहे. सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ (Radhe - Your Most Wanted Bhai) ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे.

सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मे ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT