Raghav Chadha Meet Uddhav Thackeray CM Arvind Kejriwal Bhagwant esakal
मनोरंजन

Raghav Chaddha : राघव चढ्ढा सासूरवाडीत आला पण, परिला नाही उद्धव ठाकरेंना भेटला!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांचा नुकताच साखरपुडा दिल्लीत पार पडला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डेटिंगची चर्चा रंगली होती.

युगंधर ताजणे

Raghav Chadha Meet Uddhav Thackeray CM Arvind Kejriwal : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांचा नुकताच साखरपुडा दिल्लीत पार पडला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डेटिंगची चर्चा रंगली होती. अखेर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यावरुन व्हायरल होणाऱ्या अफवांवर पडदा पडला आहे. आता राघव चढ्ढा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

त्याचे झाले असे की, आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोट बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्या धर्तीवर वेगवेगळ्या बैठका, शिबीरे यांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. येत्या काळात देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा निर्धार यावेळी या नेत्यांनी व्यक्त केला.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

यासगळ्यात एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे राघव चढ्ढा. ते आपचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा आणि परिणीतीचा साखरपुडाही झाला आहे. त्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांचा तो फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. परिणीतीला सोडून राघव चढ्ढा त्या बैठकीत काय करताहेत असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

राघव चढ्ढा आणि परिणीतीच्या साखरपुड्यालाही विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोची जोरदार चर्चा झाली होती. केजरीवाल यांनी आपल्या खास अंदाजात चढ्ढा आणि परिणीतीला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यानंतर आता राघव चढ्ढा यांचा मातोश्रीवरील तो फोटो व्हायरल झाल्यानं सोशल मीडियावर त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ते उद्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्ली सरकारला मिळाला मात्र, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून तो निर्णय बदलला.

हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवाल यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ते ठाकरे आणि पवारांशी चर्चा करणार आहेत. पंजाबचे मुंख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार राघव चढ्ढा देखील त्यांच्यासोबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT