Raghav Juyal On Dating with Shehnaaz Gill Esakal
मनोरंजन

Shehnaaz Gill: राघव शहनाजला करतोय डेट? अखेर मौन सोडलचं म्हणाला, 'सध्या मला फक्त'

Vaishali Patil

Raghav Juyal On Dating: सध्या मनोरंजन विश्वात सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचीच चर्चा आहे. सलमानसोबत या चित्रपटात अनेक कलाकारांचा मेळावा दिसणार आहे.

सलमान या चित्रपटातुन अनेक कलाकारांना संधी देत आहे. त्यात शहनाज गिल आणि पलक तिवारी देखील त्याच बॉलिवूड डेब्यू करत आहेत. त्याच्या बरोबरच राघव जुयाल, सिद्धार्थ निगमसह अनेक दिग्गज कलाकार आहेत.

या चित्रपटांसोबतच अनेक अफवाही पसरवत आहे. ज्यात सलमान आणि पुजा हेगडे हे डेट करत होते. यावर पुजानं स्पष्टच नकार दिला तर दुसरीकडे शहनाज आणि राघव जुयाल देखील ऐकमेंकाना डेट करत आहेत अशाही चर्चा सुरु आहेत.

यावर चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा सलमाननं चित्रपटाच्या ट्रेलर रिलिज दरम्यान शहनाजला मुव्ह ऑन करण्यासाठी सांगत ती कुणाच्या तरी प्रेमात आहे असे संकेत दिले होते. त्यानंतर तो राघवच आहे अशा चर्चा सुरु झाल्यात.

याचर्चांवर शहनाज नकार दिला होता. मात्र आता राघव जुयालने देखील या चर्चांवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने शहनाजसोबत त्याचं काय नात आहे यावर स्पष्टचं वक्तव्य केलं.

राघव जुयाल म्हणाला की, 'इंटरनेटवर असलेल्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही. जोपर्यंत मी पाहतो किंवा ऐकतो मी चित्रपटासाठी आलो आहे आणि लोकांनी मला अभिनेता, डान्सर आणि होस्ट म्हणून पाहावं अशी माझी इच्छा आहे.

फक्त माझे काम बोलेल. बाकी या सर्व बोलायच्या गोष्टी आहेत, त्या अस्तित्वात नाहीत आणि नसतील, कारण माझ्याकडे त्यासाठी वेळ नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करतो.

सध्या माझी अवस्था अशी आहे की मला या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही. त्यामुळे मला माझ्या कामाबद्दल आणि चित्रपटाबद्दल बोलायला आवडेल, इतकचं'

'किसी का भाई किसी की जान'मध्ये राघव आणि शहनाज गिल जोडीच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघेही पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत.

शूटिंगदरम्यान असे बोलले जात होतं की दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. अनेकवेळा ते एकत्र फिरतानाही दिसले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT