raj kundra  sakal media
मनोरंजन

राज कुंद्राच्या दोन अ‍ॅपमधून मिळाले 51 पॉर्न व्हिडिओ

बॉलीवूडची अभिनेत्री (bollywood actress shilpa shetty) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (raj kundra) हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री (bollywood actress shilpa shetty) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (raj kundra) हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी जामीनासाठी अर्जही केला होता. मात्र न्यायालयानं तो फेटाळून लावला. त्यानंतर शिल्पानंही काही माध्यमांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यात तिनं आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होतोय अशी तक्रार न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयानं तिला झापत माध्यमांनी सुत्रांच्या माहितीनुसार केलेलं वार्तांकन चूकीचं कसं असा प्रश्न विचारला होता. आता राजच्या बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ( raj kundra adult films case public prosecutor informed the bombay hc 51 adult films seized from two apps yst88)

राजच्या पॉर्नाग्राफी (pornography) प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे आरोप पुढे येताना दिसत आहे. त्यामुळे त्याची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या महिन्यात मुंबई क्राईम ब्रँचनं त्याच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते एका अॅपच्या माध्यमातून शेयर करणे यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. राजच्या कंपनीच्या विरोधात काही गोष्टी समोर आल्या आहेत. आता नवीन माहिती अशी आहे की, मुंबई पोलिसांना राजच्या त्या दोन अॅपमधून 51 पॉर्न फिल्म मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात असे सांगितले की, पोलिसांनी राजकडून ते 51 अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. हे व्हिडिओ राजच्या त्या दोन अॅपमधून मिळाले आहेत. हॉटशॉट अॅपमधून ते व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. या व्हिडिओचा संबंध राजशी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे झालेल्या या सुनावणीमध्ये राज कुंद्रा आणि रायन थॉर्पेवर अश्लील कंटेट स्ट्रिमिंग करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी राजच्या फोन आणि स्टोरेज डिव्हाईसमधूनही काही कंटेट जप्त केला आहे. 19 जुलैला राजला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर अश्लील व्हिडिओची निर्मिती करणे आणि ते प्रसारित करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा लॅपटॉप, सीडीआर, मोबाईल फोन, स्टोरेज एरिया नेटवर्क डिव्हाईस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अश्‍लील चित्रपट निर्मिती आणि त्याचा कन्टेंट तयार केल्याच्या आरोपात पोलिसांनी कुंद्रावर फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४१ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे; मात्र पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असून कुंद्रा तपासात सहकार्य करत होता, असा दावा करणारी याचिका कुंद्राच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी केली आहे. तसेच दुसरा आरोपी रॉयन थॉर्पनेदेखील न्यायालयात याचिका केली आहे. न्या. अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Mahabaleshwar Municipal Polls: महाबळेश्‍‍वरमध्‍ये राष्‍ट्रवादीने घडविला इतिहास!नगराध्‍यक्षपदासह १३ जागांवर विजय; भाजपला एक अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT