Raj Kundra Covered his face to avoid media on karva chauth with shilpa shetty sieve at anil kapoor's house. Instagram
मनोरंजन

Viral Video: करवा चौथच्या दिवशी राज कुंद्राची तोंड लपवण्यासाठी अजब हरकत; हसावं की रडावं काहीच कळंना..

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा करवा चौथ सेलिब्रेशनसाठी अनिल कपूर यांच्या घरी गेले होते,तेव्हाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

प्रणाली मोरे

Raj Kundra: नुकत्याच पार पडलेल्या करवा चौथचा आनंदसोहळा देशभरात अनुभवण्यास मिळाला. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनीही हा दिवस खास अंदाजात साजरा केला. अर्थात बॉलीवूडमध्ये अनिल कपूर यांच्या घरी करवा चौथला मोठा तामझाम असतो. बॉलीवूडच्या सगळ्या सौभाग्यवती झाडून अनिल कपूर यांच्या घरी सेलिब्रेशनसाठी उपस्थित राहतात. सगळ्या अभिनेत्री आपलं व्रत या सोहोळ्यातच पूर्ण करतात. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा देखील यंदा करवा चौथला अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले होते.(Raj Kundra Covered his face to avoid media on karva chauth with shilpa shetty sieve at anil kapoor's house.)

तिथेही राज कुंद्रा आपला चेहरा लपवतच आला अन् ट्रोल झाला. तर ट्रोलर्सनी शिल्पा शेट्टीला देखील यामुळे धारेवर धरलं. करवा चौथच्या खास दिनी अनिल कपूर यांच्या घरी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी आले अन् तिथे पापाराझीला पाहताच राजने आपला चेहरा करवा चौथच्या पूजेच्या चाळणीनं लपवला,ज्याच्यावर SSK लिहिलं होतं. आता नेमकं याचमुळे राज कुंद्रा अन् सोबत शिल्पा शेट्टीलाही ट्रोल केलं जात आहे.

एका ट्रोलरनं लिहिलं आहे,'असं कामच का करा,ज्यामुळे तोंड लपवायची वेळ यावी'. तर दुसऱ्या एका ट्रोलरनं लिहिलं आहे,'किती नौटंकी करतोय'. आणखी एकानं लिहिलं की, 'करवा चौथला शिल्पानं जे करायचं ते हा का करतोय?' तर कुणीतरी लिहिलं आहे,'हे असं करुन हा खऱ्या अर्थानं आपलं नाव खराब करतोय. एवढं तर आधीपण याचं नाव डागाळलं नसेल'. असे कितीतरी कमेंट्स, राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीच्या त्या व्हायरल व्हिडीओवर वाचायला मिळत आहेत.

या व्हिडीओत सुरुवातीला शिल्पाचे करवा चौथ सेलिब्रेशनचे काही फोटो पहायला मिळत आहेत. या फोटोवरनं शिल्पाला खूप ट्रोल केलं गेलं. एक ट्रोलरनं लिहिलं आहे,'आपला नवरा असा असताना हिनं त्याच्यासाठी व्रत ठेवलं', तर दुसऱ्या एकानं लिहिलं,'पत्नी असावी तर अशी, क्रिमिनल नवऱ्यासाठीही करवा चौथ'. पण असं असलं तरी चाहत्यांनी शिल्पाच्या करवा चौथ स्पेशल लूकचं तोंडभरून कौतूक केलं. राज कुंद्रानं पोर्न केसच्या प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यानंतर एकदाही आपला चेहरा मीडियासमोर दाखवलेला नाही. तो नेहमीच वेगवेगळे मास्क लावून दिसतो. त्या मास्कमुळे त्याचा चेहराच दिसत नाही.

शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर करवा चौथच्या आपल्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत तिच्यासोबत राज कुंद्रा देखील दिसत आहे. करवा चौथचं सेलिब्रेशन करताना शिल्पा दिसत आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले आहे की, ''राजसाठी व्रत ठेवलं होतं''. हे फोटो अनिल कपूर यांनी क्लिक केले आहेत. शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी २००९ मध्ये लग्न केलं होतं. २०१२ मध्ये शिल्पानं विआन या आपल्या मोठ्या मुलाला जन्म दिला. तर २०२० मध्ये सरोगसीच्या माध्यमातून शिल्पा आणि राजच्या आयुष्यात समिशा ही त्यांची धाकटी मुलगी आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT