Rajkummar Rao- Patralekha Viral Video Esakal
मनोरंजन

Rajkummar- Patralekha Video: राजकुमार अन् पत्नी पत्रलेखाचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल! फराह खानने केला शेयर

Vaishali Patil

Rajkumar Rao- Patralekha Viral Video: राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमारला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. राजकुमारने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राजकुमार त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा या दोघांची जोडी देखील चाहत्यांना खुप आवडते. गेल्या 13 वर्षापासून ते एकत्र आहेत.

राजकुमार राव आणि पत्रलेखा हे दिग्दर्शक फराह खान, हुमा कुरेशी आणि साकिब सलीम हे जवळचे मित्र आहेत. अनेकदा ते पार्टीत एकत्र दिसतात. या गँगने नुकतीच नाइट आउट पार्टी केली होती. याच पार्टीतील राजकुमार आणि पत्रलेखा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फराहने तिच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात राजकुमार आणि पत्रलेखा हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसले. मात्र त्यात हुमा आणि साकिब यांनी त्यांना त्रास दिला.

फराह खानने हा व्हिडिओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "वेड्या मित्रांसोबत क्रेझी रात्र, राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सांगितले की हे चालणार नाही. साकिब सलीम आणि हुमा कुरेशी हे पापाराझींना स्पर्धा देत आहेत..."

राजकुमार राव आणि पत्रलेखा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे आहे. बऱ्याच काळ डेट केल्यानंतर त्यांनी 15 नोव्हेंबर 2021 रोजी लग्न केले. एका मुलाखतीत पत्रलेखाने सांगितले होते की, तिने राजचा पहिला चित्रपट 'लव्ह सेक्स और धोका' होता. नंतर त्यांची मैत्री झाली. या दोघांनी 2014 मध्ये आलेल्या 'सिटीलाइट्स' चित्रपटात एकत्र काम केले होते.

त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. तर राजकुमारने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला की, पत्रलेखावर त्याचा आधीपासूनच क्रश होता. एका शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र काम केले तेव्हा तो पहिल्यांदा तिला भेटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT