Raju Srivastav Death esakal
मनोरंजन

Raju Srivastav Death: 'रेड्यावर तुम्ही बसा, मी पायी येतो'! यमराजाला दिलं होतं उत्तर

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे

Raju Srivastav Death News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली (Comedian Raju Srivastava dies at 58) वाहिली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरु होते. ट्रेड मिलवर धावताना त्यांना अचानक हदयविकाराचा धक्का आला होता. त्यात ते (Great Indian Laughter Show) बेशुद्ध झाले होते. डॉक्टरांनी राजू यांना शुद्धीवर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांची अपुरी ठरल्याचे दिसून आले आहे.

कॉमेडीचा बादशहा म्हणून राजू यांची मनोरंजन विश्वाला ओळख होती. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या विनोदी अंदाजानं राजू यांनी चाहत्यांचे, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. मोठ्या संघर्षातून आपली स्वताची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजू यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेजमधून त्यांनी मनमुराद प्रेक्षकांना हसवले. राजू एम्समध्ये दाखल होताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. डॉक्टरांनी देखील काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली होती.

राजू यांच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. राजू यांना चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राजू यांचा यमराजांवरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी यमराजावर आपल्या खास अंदाजात टिप्पणी केली होती. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राजू यांनी यमराजाला त्या व्हिडिओमधून सुनावले होते.

एखाद्या व्यक्तीला मरणाच्या दारात असताना देखील कसे असले पाहिजे यावर राजू यांनी त्या व्हिडिओमध्ये विनोदी ढंगात उत्तर दिलं होतं. तो व्हिडिओ शेयर करताना त्यांनी त्याला एक कॅप्शन दिले होते. यमराजाच्या रेड्यावर बसायचंय? त्यावर राजू म्हणतात, आयुष्यात असं काही काम करा की, यमराजही तुम्हाला न्यायला आले तरी ते तुम्हाला म्हटले पाहिजे, महाराज, तुम्ही रेड्यावर बसा. आम्ही पायी येतो....तुम्ही पायी चालणं आम्हाला आवडणार नाही. राजू यांच्या त्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT