Raju Srivastav Health Update News Raju Srivastav Health Update News
मनोरंजन

Raju Srivastav : राजू श्रीवास्तवबद्दल डॉक्टर म्हणाले; बरा होईल, पण...

राजूला शुद्ध आलेली नाही

सकाळ डिजिटल टीम

Raju Srivastav Health Update News राजू श्रीवास्तव बऱ्याच दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. १० ऑगस्टला दिल्लीतील हॉटेलच्या जिममध्ये वर्कआऊट करताना राजूची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून राजूच्या प्रकृतीचे अपडेट्स येत राहतात. राजू (Raju Srivastav) लवकर बरा व्हावा यासाठी चाहते खूप प्रार्थना करीत आहेत. आता राजूबद्दल नवीन अपडेट आले आहे.

राजू बरा होईल, असे आश्वासन डॉक्टरांनी दिल्याचे राजूचे प्रतिनिधी सांगतात. मात्र, त्यासाठी थोडा वेळ लागेल. राजूची (Raju Srivastav) प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत आहेत. मात्र, अद्याप राजूला शुद्ध आलेली नाही. तो व्हेंटिलेटरवर असून, डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत. ‘डॉक्टर उपचार करीत आहेत. त्यांची तब्येत सुधारण्याची वाट पाहत आहोत’, असे राजूची मुलगी अंतरा हिने मुलाखतीत सांगितले होते.

यापूर्वी शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तवच्या आरोग्याच्या अपडेटवर ट्विट केले होते आणि म्हटले होते की, राजूच्या प्रकृतीचे अपडेट कुटुंबीयांकडून आले आहे. राजूचे अवयव चांगले काम करीत आहे. राजू अद्याप शुद्धीवर नसला तरी तो लवकरच बरा होईल, अशी आशा डॉक्टरांना (Doctor) आहे.

काही दिवसांपूर्वी राजूबद्दल अनेक चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यानंतर राजूची पत्नीने मुलाखतीत सांगितले की, मी सर्वांना विनंती करते की राजूच्या प्रकृतीबद्दल खोट्या अफवा पसरवू नका. तो लवकरच परत येईल. डॉक्टर त्यांचे सर्वोत्तम देत आहेत आणि राजूची त्यांना साथ देत आहेत. तो या आजाराशी लढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT