Kangana Ranaut
Kangana Ranaut  
मनोरंजन

Lock UPP: राखीचं कंगनाला चँलेज, हिंमत असेल तर तु फक्त...

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actress: बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं तिच्या रियॅलिटी शो ची घोषणा केली होती. त्यामध्ये तिनं बॉलीवूड सेलिब्रेटींना (Bollywood Celebrity) आपण आपल्या तऱ्हेनं बोलतं करणार असल्याचे सांगितले होते. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चेला (Social Media News) उधाण आले होते. आता कंगनाला त्या शो वरुन सेलिब्रेटी राखी सावंतनं आव्हान दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात राखी आणि कंगना यांच्यात तु तु मैं मैं होणार असल्याची शक्यता आहे. कंगनाच्या त्या शो च्या टीझरमध्ये तिनं हे काही तुमच्या मोठ्या भावाचे घर नसून माझं जेल आहे. अशा शब्दांत त्याबद्दल सांगितले होते. तोच धागा पकडून आता राखीनं कंगनाला सुनावलं आहे. Bollywood Actress Kangana Ranaut News

वास्तविक कंगनानं अप्रत्यक्षपणे सलमानचं नाव घेत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे नेटकऱ्यांना कंगनाच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे हे कळले. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले. आता यासगळ्यात राखीनं सलमानच्या बाजुनं बोलताना कंगनाला धारेवर धरले आहे. आणि तिला चांगलेच खडसावले आहे. राखीनं कंगनाला आव्हान दिल आहे. त्यामध्ये ती म्हणते, कंगना जे काही बोलली त्याचे मला खूप वाईट वाटले. तिनं हे काही तुमच्या भावाचे घर नाही. तर माझं जेल आहे. आणि इथे मी म्हणेल तोच कायदा असेल. मी याठिकाणी भल्याभल्यांना बोलतं करणार आहे. असं ती म्हणाली होती. कंगनाचे हे बोलणे आपल्याला पटले नाही. अशी प्रतिक्रिया राखीनं दिलं आहे.

भाई गेल्या 15 वर्षांपासून बिग बॉसचा शो चालवत आहे. आणि कंगना आता कुठे रियॅलिटी शो मध्ये आली आहे. तेव्हा मी तिला तर ओपन चँलेज करते. सलमाननं जेवढा काळ शो चालवला त्याच रितीनं तिनं तो यशस्वी करुन दाखवावा. कंगनानं जास्त नाही पण किमान एक वर्ष जरी शो चालवला तरी मी तिचं कौतूक करेन. अशा प्रकारची प्रतिक्रिया राखीनं कंगनाच्या त्या वक्तव्यावरुन दिली आहे. माझ्याकडे सगळ्यांच्या फाईल्स असून आता मी त्या ओपन करणार आहे. आणि त्यातून प्रेक्षकांसमोर सगळ्यांची स्टोरी मांडणार आहे. असं कंगनानं त्या शो च्या टीझरमध्ये म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT