Ranveer Singh news  esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: 'रणवीरचा न्युड फोटो, मुलींवर उपकारच!'

बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Rakhi Sawant News: बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यानं केलेलं न्युड फोटोशुट. (Bollywood Actor Ranveer Singh News) गेल्या आठवड्यात रणवीरनं केलेलं ते फोटो शुट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. यावेळी बॉलीवूडमधील (Bollywood Actor) अनेक सेलिब्रेटी त्याच्या सपोर्टसाठी आले होते. त्यात अर्जुन कपूर, मलायका, करिना कपूर, आलिया भट्ट एवढेच नाही तर दीपिकानं देखील रणवीरची बाजू घेतली आहे.

यासगळ्यात राखीनं मात्र रणवीरच्या त्या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. ती काय म्हटली हे आपण जाणून घेणार आहोत. बिग बॉस फेम आणि मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन म्हणून राखीला ओळखले जाते. दरवेळी काही हटके वक्तव्य करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणे राखीला जमले आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कोणत्या एका गोष्टीवर राखी काय म्हणते याला जास्त महत्व नेटकऱ्यांच्या दृष्टीने असते. सोशल मीडियावर राखी त्यामुळे लाईमलाईटमध्ये असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

आता राखीनं रणवीरच्या त्या बोल्ड फोटोशुटवर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, मी आता फारच थकले आहे. नुकतीच दुबईवरुन आले आहे. आणि रणवीरच्या त्या फोटोंवरुन बातमी ऐकली. अरे सगळ्या मुली कॅमेऱ्यासमोर त्याच अवस्थेत येतात. तेव्हा एकटा रणवीर आला तर त्यानं मुलींवर उपकारच केले आहे. अशी प्रतिक्रिया राखीनं दिली आहे. तिच्या त्या प्रतिक्रियेला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

रणवीरच्या त्या फोटोशुटवरील वाद संपण्याचे नाव घेत नाही. त्याच्या बाजुनं उभं राहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यात बॉलीवूड सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे. जान्हवी कपूर. करण जोहर, परिणीती चोप्रा यांनी रणवीरची बाजु घेतली आहे. आम्हाला आता समाधान वाटत आहे. त्याचे कारण कोणी तरी एका मुलानं बोल्ड फोटोशुट केलं आहे. त्याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Accident Viral Video : आजोबा अन् २ नातवांना भरधाव 'थार'ने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Suryavanshi ची राजस्थान रॉयल्सच्या संघसहकाऱ्यांना मोठ्ठी बर्थडे पार्टी; बिल बघून म्हणाला, 'खूपच महाग आहे, पण...',

'कदाचित तिचा फोन नंबर आता तो...' एक्स गर्लफ्रेंडबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले...

Parbhani News: मनपाच्या करवसुली मोहिमेस ब्रेक; रोज केवळ १२ ते १३ लाखांची वसुली, विविध करांची परभणीत १६० कोटी बाकी

SCROLL FOR NEXT