Rakhi Sawant And Ritesh
Rakhi Sawant And Ritesh 
मनोरंजन

रितेशसोबत काडीमोड: पत्नी म्हणे, आता आम्ही फक्त मित्र...

सकाळ डिजिटल टीम

Entertainment News: भारतीय टेलिव्हिजनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसचे (Bigg Boss15) नाव घेतले जाते. यंदाचा बिग बॉसचा 15 वा सीझन देखील कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. यामध्ये शोच्या टीआरपीमध्ये (Bollywood News) वाढ व्हावी म्हणून निर्मात्यांनी एक वेगळी कल्पना पुढे आणली ती म्हणजे वाईल्ड कार्डव्दारे गेल्या सीझनच्या बिग बॉसच्या स्पर्धकांना पुन्हा बिग बॉसच्या घरात इंट्री देण्यात आली होती. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)आणि अभिजित बिचुकलेचा समावेश होता. यावेळी राखी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली होती. (Rakhi Sawant husband Ritesh)

राखीनं रितेश नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचे यावेळी तिच्या असंख्य चाहत्यांना कळले होते. बिग बॉसचा होस्ट सलमानला देखील यावेळी धक्का बसला होता. तो म्हणजे राखीनं लग्न केलं याचा. आता आणखी एक असाच धक्का राखीनं दिला आहे. तो म्हणजे राखी आणि तिचा पती रितेश यांचा घटस्फोट झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिनं आम्ही यापुढे पती पत्नी नसून केवळ मित्र असल्याचे सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. यावरुन नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे राखीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

राखीनं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही धक्कादायक बातमी दिली आहे. त्यामध्ये तिनं सांगितलं आहे की, आता माझं आणि रितेशचं नातं हे केवळ मैत्रीपुरते आहे. तो आता माझा पती नाही. यावेळी राखीला तिच्या एलिमिनेशनवरुनही प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राखी म्हणाली, मला त्याचे खूप वाईट वाटले. यावेळी मी देवाला प्रश्न विचारला की, मला यंदाच्या सीझनमध्ये देखील विजेतेपद मिळालं नाही. त्यामुळे मी कमालीची नाराज झाल्याचे राखीनं सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT