Rakhi Sawant Wedding esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Wedding : लग्नानंतर राखी झाली 'फातिमा', धर्म बदलला!

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंतनं तिचा बॉयफ्रेंड आदिल खानशी लग्न केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rakhi Sawant Now Muslim Religion named fatima wedding : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंतनं तिचा बॉयफ्रेंड आदिल खानशी लग्न केलं आहे. केवळ लग्न करुन राखी थांबलेली नाही तर तिनं धर्म परिवर्तनही करुन घेतलं आहे. यावर आता सोशल मीडियावर राखीला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील राखीला चांगलेच सुनावले आहे. तुला आता मुस्लिम धर्म स्विकारावा लागेल. असे म्हणून तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिला धर्म बदलावाच लागणार होता. यानंतरच्या काळात देखील तुम्हाला तुमच्या पतीच्या धर्मानुसार राहावे लागणार आहे. अशा आशयाचे ट्विट नसरीन यांनी केले आहे.

Also Read - पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

नसरीन यांना नेटकऱ्यांनी जशास तसे उत्तर देत ट्रोल केले आहे. दुसरीकडे राखीला चांगलेच सुनावले आहे. राखी तू जे काही केले त्याबद्दल विचार केला आहेस का, यापूर्वी देखील तू लग्न केले असे सांगून जो प्रकार केला होता तो सर्वांना माहिती आहे. बिग बॉसमध्ये आम्ही हे सगळे पाहिले आहे. आता तू मुस्लिम तरुणाशी लग्न केले आहे. धर्म परिवर्तन केले आहे. तुला शुभेच्छा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राखीनं तिचं नाव आता फातिमा केलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर नेटकरी वेगानं प्रतिक्रिया देत आहेत. यावर राखीच्या भावानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, आम्हाला राखीची खूप चिंता आहे. तिनं तिच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. तिनं जे काही केले त्याबद्दल पूर्ण विचार केला असेल. त्यामुळे मला चिंता नाही.

राखी आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल खान यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी राखीवर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी राखीनं तिच्या लग्नाची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT