rakhi sawant reached police station to file a complaint against her ex-husband Ritesh sakal
मनोरंजन

राखी सावंत प्रियकरासोबत पोलिस ठाण्यात.. पहिल्या नवऱ्याची केली तक्रार

यावेळी चक्क राखी सावंत रडली आणि प्रियकराने तिला धीर दिला.

नीलेश अडसूळ

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंत ही (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिनं यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. कधी ती व्हिडिओ शेअर करते तर एखादी अशी प्रतिक्रिया देते ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले जाते. आता मात्र राखी चक्क रडताना समोर आली आहे. राखी आणि रडणे हे समीकरण काहीसे विचित्र आहे पण हे खरे आहे,. नुकतीच राखी आपल्या प्रियकरसोबत मिडियासमोर आली आणि तिने एक धक्कादायक माहिती उघड केली. (Rakhi Sawant Latest Video) (rakhi sawant reached police station to file a complaint against her ex-husband Ritesh)

नुकताच राखीचा एक नवीन व्हिडीओ (viral Video) समोर आला आहे. राखी सावंत पूर्वाश्रमीचा नवरा रितेशवर संशय घेत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. राखी शनिवारी रात्री ओशिवरा पोलीस स्टेशनला गेली होती. तेव्हा पोलीस स्टेशनच्या बाहेरच मीडियाने तिची वाट अडवली. यावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडताना दिसत आहे. तर तिचा प्रियकर तिला धीर देत आहे.

राखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. यामागे तिचा पूर्वाश्रमीचा नवरा रितेश असल्याचा तिचा संशय आहे, म्हणूनच ती पोलीस स्टेशन,ला तक्रार देण्यासाठी गेली होती. यावेळी ती म्हणाली, 'मला माहित आहे की मी तीन वर्षे कशी काढली. लॉकडाऊनमध्ये मी एकटी पडले होते. म्हणूनच मी त्याला सोडले. देवाने असा पती कोणाला देऊ नये. आता त्याच्याविरुद्ध तक्रार करत आहे. मला गलिच्छ मेसेज येत आहेत. चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. त्याने मला फसवलं आहे. तो माझा फोनही उचलत नाही. त्याने मला छळलं आहे. धक्के मारून घरातून बाहेर काढलं आहे. पण मी कधीही तक्रार केली नाही. पण आता त्याने माझ्या सोशल मिडियावर अकाऊंटवर अटॅक केला आहे, तो माझ्या अश्लील व्हिडिओही पोस्ट करू शकतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT