Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: राखीचं हे लग्नही धोक्यात! 'माझी आई गेल्यानंतर लग्न...' राखीची संकटे काही संपेना

सकाळ डिजिटल टीम

सध्या राखी सावंत ही चर्चेत आली आहे. तिची आई, तिचं लग्न आणि तिचा शर्लिनसोबतचा वाद यामुळे सध्या तिच्यावर अनेक संकट आल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपुर्वीच तिच्या आईचे निधन झाले. तिची आई ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होती. आईच्या दुखातून सावरलीही नसतांना पुन्हा तिचं आदिलसोबतचं लग्न हे धोक्यात आल्याचं तिनं सांगितलं आहे.

आईचे निधन होऊन काहीच दिवस झाले. दरम्यान, तिचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. ती आपलं लग्न धोक्यात आल्याचं ओरडून सांगत आहे. तिने सांगितले की तिचे लग्न धोक्यात आले आहे आणि ती तीव्र नैराश्याने ग्रस्त असल्याचंही बोलत आहे.

पापाराझीने नुकतेच राखी सावंत आईला मुंबईत पाहिले. तिने पापाराझींना सांगितले की, माझे लग्न धोक्यात आले आहे. मला माझे लग्न वाचवायचं आहे. लग्न म्हणजे जोक नाही. माझ्या आयुष्यात येऊन कोणाला काय मिळतं. कोणाला काय मिळतंय कोण येतंय माझ्या वैवाहिक आयुष्यात. माझ्यावर अत्याचार करू नका मला खुप जास्त त्रास होत नाही. संपूर्ण व्हिडिओमध्ये राखी सावंत रडताना आणि किंचाळताना दिसली. देव मला मारुन टाक, असेही ती म्हणते.

राखीने बॉयफ्रेंड आदिल दुर्राणी खान याच्याशी लग्न केले आहे. तिने लग्नानंतर धर्म बदलला आणि आपले नाव फातिमा ठेवले. सुरुवातीला आदिल खान या कोर्ट मॅरेज आणि निकाहनाम्यावर मौन बाळगून होता आणि नंतर काही दिवसांनी आदिल दुर्रानी खाननेही या लग्नाला होकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: मोहन भागवतांच्या 'जेन-झीं'बद्दलच्या विधानावर अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया; भाजपला कानपिचक्या, म्हणाले...

CM विजयचा मोठा निर्णय! आता मोबाईलवरूनच दारूची बुकिंग करता येणार; कमी पैशात दारू मिळणार?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

जिनिलिया देशमुख मुलांना जेवणात 'ही' गोष्ट आवर्जून देतेच; म्हणते- दररोज एक चमचा खाणं कम्पलसरी...

Pension Issue : पुणे जिल्ह्यात तीन महिन्यांपासून दिव्यांग, निराधारांची पेन्शन रखडली

SCROLL FOR NEXT