Rakhi Sawant  esakal
मनोरंजन

Rakhi Sawant : 'राहुलजी तुम्हाला लोकसभा जिंकायचीय'? मी सांगते तसं करा! चक्क राखीनं दिला कानमंत्र

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये राखी सावंत हे नाव वेगवेगळ्या कारणासाठी घेतले जाते.

युगंधर ताजणे

Rakhi Sawant Suggest Rahul Gandhi : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये राखी सावंत हे नाव वेगवेगळ्या कारणासाठी घेतले जाते. मनोरंजनासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी राखी काहीही करु शकते हे तिच्या आतापर्यंतच्या वक्तव्यावरून आणि व्हिडिओवरुन दिसून आले आहे. राखीनं लग्न केलं ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी देखील धक्कादायक होती. तिच्या लग्नाला आठवडाही झाला नाही तोच तिचं लग्न मोडलं. यानंतर राखी मात्र कमालीची बेतालपणे वागू लागली.

आता राखी तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. खरं तर राखी कुणाला काही सल्ला देऊ शकते. कुणासोबतही भांडू शकते. ती तिच्या भूमिकेवर नेहमीच ठाम असते असेही नाही. आपल्या बोलण्यामुळे चर्चा होते. आपण नेहमीच लाईमलाईटमध्ये राहतो हे राखीला कळून चुकले आहे. त्यामुळे कधी राजकीय, कधी सामाजिक तर कधी मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या घडामोडींवर बोलताना दिसते.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

राखीनं तिच्या एका व्हिडिओमधून कॉग्रेसचे लोकप्रिय नेते राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. तो सल्ला आहे त्यांनी लोकसभा निवडणूक कशी जिंकावी याबाबत. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. राखीनं चक्क राहुल गांधींना लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा कानमंत्र दिल्यानं नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राखी तू राहुल गांधीविषयी काय सांगशील असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणते, राहुलजींनी बिग बॉसमध्ये यायला पाहिजे. तसं झाल्यास ते लोकसभेची निवडणूक नक्की जिंकतील. असा विश्वास राखीला वाटतो. त्याचे कारण ती सांगते, बिग बॉसमधून व्यक्ती जास्तीत जास्त लोकांपर्यत जाते. यामुळे त्यांनी जर तसे केले तर त्यांना त्याचा फायदाच होईल. राखीची ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

यापूर्वी देखील राखीनं केलेल्या तऱ्हेवाईक राजकीय विधानांनी नेटकरी अवाक् झाले होते. तिनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील एक कमेंट केली होती. त्यामुळे राखी चर्चेचा विषय झाली होती. आता तिनं थेट राहूल गांधींना सल्ला दिला आहे. तो सल्ला राहूल गांधी ऐकणार का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्रे कोर्टानंतर आता टाटा मेमोरियल; बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच,पोलिसांचा हाय अलर्ट

'गहराइयां सिनेमातील इंटिमेंट सीन खूप विचित्र होता' दीपिकाने सांगितलेला अनुभव, म्हणालेली...'सीन करताना मला...'

Deepika Padukone : हटके अंदाजात दीपिकाने वाढदिवस केला साजरा, चाहत्यांसोबत केक कटिंग आणि बरच काही... Viral Video

Latest Marathi News Live Update : आम्ही निवडणुकीत अजित पवार यांना मागे टाकून पुण्यात विजय मिळवू - भाजप नेते राम कदम

बेन स्टोक्स-मार्नस लॅब्युशेन भिडले, Ashes च्या शेवटच्या सामन्यात राडा; Video Viral

SCROLL FOR NEXT