Rakhi Sawant Google
मनोरंजन

राखी सावंतवर हसणाऱ्यांनो कधीतरी तिच्यातील माणुसकीलाही दाद द्या !

सोशल मीडियावर सध्या राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,जो पाहिल्यानंतर राखीला ट्रोल करणारा ट्रोलरही भावूक झाला.

प्रणाली मोरे

राखी सावंत(Rakhi Sawant) हे नाव तसं चर्चेतलं. अर्थात तिच्या वागण्यावरनं नेहमीच टीकेचाच सुर उमटतो किंवा तिची खिल्ली उडवणारा हशा पिकतो. पण या सगळ्याला भीक घालेल ती राखी सावंत कुठली. ती कधीच आपल्यावर होणाऱ्या टीकेचा किंवा जोक्सचा फारसा विचार करताना दिसत नाही. उलट नेहमीच दिसून आलंय की आजच्या पेक्षा उद्या ती काहीतरी अधिक बोलून गेलीय किंवा विचित्र वागली आहे. आता हे सगळं चर्चेत राहण्यासाठी ती करत असेलही बहुधा पण मग बॉलीवूडमधले भलेभले सेलिब्रिटीही करतातच की त्यांच्या त्यांच्या लेवलला सूट होईल असं काहीतरी हटके, असो,इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नसताना,मध्यम वर्गीय कुटुंबाच्या बॅकग्राऊंडमधून आली असतानाही तीनं स्वतःच्या हिमतीवर पहिला म्युझिक अल्बम मिळवला अन् पुढे चर्चेतही आली,. मग सिनेमातनं आयटम सॉंग असो की बिग बॉसच्या घरात दोनदा केलेली वारी असो वेगवेगळ्या पद्धतीनं राखी सावंत प्रेक्षकांसमोर येतच राहिली.

बिग बॉस १५ च्या सीझनमध्ये अनेक दिवसांपासून केवळ चर्चेत असलेला तिचा नवरा अचानक प्रगट झाला अन् सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण घरातनं बाहेर येताच तिचं रितेशसोबत तुटलेलं नातंही तिनं अगदी व्यवस्थित चर्चेत ठेवलं. आता तिच्या वागण्या-बोलण्यात किती खरेपणा-खोटेपणा देव जाणो. पण ती अनेकदा खरी वाटते. हो मी विचित्र आहे,काहीही बोलते,वागते पण जे आहे ते खुलेपणाने दाखवते. आडून काहीच करत नाही. तिच्यावर आतापर्यंत फक्त टीका आणि जोक्स करुन हसणं,मजा घेणं हेच अनेकांनी केलं आहे. पण आता तिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला गेलाय त्याची चर्चा होतेय. आणि तिच्यावर नेहमीच हसणाऱ्या नेटकऱ्यांनीही व्हिडीओ पाहून तिचं कौतूक केलं आहे.

राखी सावंत मुंबईतील रस्त्यांवर अनेकदा बिन्धास्त फिरताना दिसते. आणि त्यामुळे तिच्या मागावर नेहमीच पापाराझी असतात. म्हणजे राखी काहीतरी भन्नाट बोलेल अन् आपल्याला मसाला मिळेल हा पापाराझीचा त्यामागचा हेतू असतो. पण आता मात्र पापाराझीनं तिच्यातील माणूसकीचं दर्शन करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात राखी रस्त्यावर एका कंस्ट्रक्शन साइटवर गेली आहे. जिथे अनेक बायका आपल्या तान्ह्या मुलांना घेऊन येतात. तिथेच उन्हात ठेवतात अन् बिचाऱ्या स्वतःही कडक उन्हाचे चटके सहन करीत काम करीत असतात. राखी अशा गरीब कष्टाळू लोकांसाठी खास जेवण,ज्यूस घेऊन गेली अन् वाटू लागली. या व्हिडीओत राखी त्या भुकेनं व्याकूळ मुलांशी प्रेमानं बोलतं त्यांना ज्यूस,जेवणाचे बॉक्स वाटताना दिसत आहे. अर्थात राखीची मजा उडवतानाचे व्हिडीओ नेहमीच पाहिले जातात. पण तिच्यातील माणुसकीचं दर्शन करणाऱ्या या व्हिडीओवरही तिच्या टीकाकारांनी प्रतिक्रिया नोंदवत तिचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिक महापालिकेत आघाडीत बिघाडी? मनसेच्या एन्ट्रीवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली!

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत बदल! 'हा' महत्त्वाचा पूल २० दिवस बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

Ichalkaranji Pollution : औद्योगिक प्रगतीच्या सावलीत इचलकरंजीचा श्वास कोंडतोय; वायू प्रदूषणाने आरोग्याचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT