Rakhi Sawant Rakhi Sawant
मनोरंजन

राखी सावंत होणार पतीपासून विभक्त; सोशल मीडियावर घोषणा

सकाळ डिजिटल टीम

ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतने (Rakhi Sawant) पती रितेशपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. रिलेशनशिपबद्दल अनेक विवादानंतर अभिनेत्री राखी सावंतने सोशल मीडियावर पती रितेशपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. तिने इंस्टाग्राम हँडलवर ‘प्रिय चाहते आणि हितचिंतकांनो, रितेश आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी बिनधास्त वक्तव्य तर कधी तोकडे कपड्यांनी ती बातम्यांचा विषय होते. कोणत्याही विषयावर बोलून ती वाद ओढवून घेत असते. मागील काही दिवासांपासून तिच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तिचे आणि पतीमध्ये विवाद सुरू असल्याचे बोलले जात होते. अशात तिने पतीपासून विभक्त होत असल्याचे सोशल मीडियावर (social media) पोस्ट शेअर करून सांगितले.

जानेवारीमध्ये संपलेल्या बिग बॉस १५ मध्ये दोघे एकत्र दिसले. या शोनंतर दोघांनी कबूल केले होते की त्यांनी कायदेशीररित्या कधीही लग्न केले नाही. प्रिय चाहते आणि हितचिंतकांनो, एवढेच सांगायचे आहे की रितेश आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस शोनंतर बरेच काही घडले आणि मला काही गोष्टींची माहिती नव्हती ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या. आम्ही आमच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला आणि गोष्टी कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मला वाटते की आम्ही दोघेही सौहार्दपूर्णपणे पुढे जाणे चांगले आहे आणि आम्ही दोघेही स्वतंत्रपणे आमच्या जीवनाचा आनंद घेत आहोत, असे राखी सावंतने सोशल मीडियावर लिहिले.

मी रितेशला शुभेच्छा देते. आयुष्याच्या या टप्प्यावर मला माझ्या कामावर आणि आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. स्वतःला आनंदी आणि निरोगी ठेवायचे आहे. मला नेहमी समजून घेतल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, असेही राखी सावंतने लिहिले आहे. राखीने काही वर्षांपूर्वीच तिच्या लग्नाची घोषणा केली होती. परंतु, तिच्या पतीची काही माहिती दिली नव्हती. रितेशची जगासमोर ओळख करून देण्यासाठी तिने बिग बॉस १५ ची निवड केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT