Ramcharan spea 
मनोरंजन

RRR सिनेमा 'जगात नंबर 1' ठरल्यावर काय आहे रामचरणची प्रतिक्रिया?

RRR सिनेमातील मुख्य अभिनेता रामचरण यानं सिनेमाच्या यशाविषयी नुकताच एका मुलाखतीत संवाद साधत अनेक खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

राजामौली(Rajamouli) यांच्या RRR सिनेमानं जगभरात बॉक्सऑफिसवर तब्बल ९०० करोड कमावत हॉलीवूडच्या सिनेमांनाही मागे टाकलं आहे. हा सिनेमा पाहणारा प्रेक्षक सिनेमातील कलाकारांच्या अभिनयापासून ते दिग्दर्शकाच्या स्पेशल टचपर्यंत ते अगदी छोट्या-मोठ्या सर्वच तांत्रिक बाबींपर्यंत सारंच उत्कृष्ट असल्याचं सांगत सुटले आहेत. पण नुकतंच या सिनेमातील मुख्य अभिनेता रामचरण यानं मात्र आपणच या एवढ्या मोठ्या यशाची कल्पनाच केली नव्हती असं म्हटलं आहे. सिनेमा हीट होईल हे माहित होतं पण जगात नंबर 1 ठरेल असं वाटलंच नव्हतं असं रामचरणनं म्हटलं आहे. नुकत्याच सिनेमाच्या यशानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं याविषयी खुलासा केला आहे,सोबत आपले वडिल चिरंजीवी यांच्यासोबत 'आचार्य' सिनेमातील कामाचा अनुभवही त्यानं शेअर केला आहे.

RRR सिनेमा हा एक काल्पनिक पण स्वातंत्र्यसैनिकांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. त्यामुळे अर्थातच त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होतीच. कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामा राजू या दोन सिनेमातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण(Ramcharan) यांनी साकारल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ सिनेमात दाखवला गेला आहे. या सिनेमात अजय देवगण,आलिया भट्ट,श्रिया सरन अशा अनेक चांगल्या कलाकारांनी काम केलं आहे. रामचरणनं नुकत्याच एका मुलाखतीत RRR सिनेमाच्या यशाविषयी बातचीत करताना जगभरात मिळालेलं यश आणि नंबर 1 चं पद अपेक्षित नव्हतं असं मोकळेपणानं सांगितलं आहे. तो म्हणाला,''सिनेमा हीट ठरेल,चांगला बिझनेस करेल इथपर्यंत मला खात्री होती पण नंबर 1 पद मिळवेल असं वाटलं नव्हतं आणि माझ्यासाठी हे सगळं आश्चर्यकारक आहे. पण हे सगळं घडतंय ते आमच्यासाठी खूप अप्रतिम गोष्ट आहे अगदी राजामौली यांच्यासाठी देखील, असं रामचरणनं म्हटलं आहे''.

तर याचवेळी ज्युनिअर एनटीआरविषयी एक विशेष विधान करुन सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आहे. तो म्हणाला,''तारकमध्ये आणि माझ्यात व्यावसायिक पातळीवर स्पर्धा होती पण RRR सिनेमात एकत्र काम करण्याआधी देखील आम्ही चांगले मित्र होतो. त्यानं यावेळी 'आचार्य' सिनेमात वडिल चिरंजीवी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील शेअर केला. तो म्हणाला,''हे माझं स्वप्न होतं ते सत्यात उतरलं. मी खूप शिकलो त्यांच्याकडून. मी सहकलाकार म्हणून 'आचार्य'त काम केलं नाही तर एक विद्यार्थी म्हणून मला शिकायचं आहे हा विचार ठेवून मी काम केलं. नव्हतो. माझ्या वडिलांनीही मला चूका करून दिल्या,ते मला सांभाळायला आले नाहीत,त्यांनी मला जशी माझी भूमिका साकारायची आहे तसं काम करण्याची मूभा दिली. ते त्यात लक्ष घालायचे नाहीत. मला अनेकदा टेक घ्यावे लागायचे पण ते शांत राहून पुन्हा माझ्यासाठी तो टेक करायचे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT