Ramesh Deo Google
मनोरंजन

रमेश देव यांना मोगरा फार आवडायचा;सांगितला होता फुलांचा धम्माल किस्सा

वयाच्या ९३ व्या वर्षी या ज्येष्ठ अभिनेत्याचं हृद्यविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधनं झालं आहे.

प्रणाली मोरे

शेवटपर्यंत भरभरून बोलणारे आणि चेहऱ्यावर कायम हास्य ठेवणारे रमेश देव(Ramesh Deo) खरंतर शंभरी गाठतील असं त्यांच्याकडे पाहून कायम वाटायचं. या वयातही वाचनाची आवड जोपासणाऱ्या रमेशजींकडे विविध विषयांवर बोलण्यासाठी माहितीचा खजिना भरभरून असायचा. त्यांची मुलाखत घेण्याचा योग अनेकदा आला. त्यांच्यासोबत गप्पा मारायला बसलं की वेळेचं भान ना त्यांना उरायचं ना ऐकणाऱ्या मला. असाच त्यांनी सीमा देव यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा माझ्यासोबत शेअर केला होता. तिथेच त्यांनी त्यांचं मोगरा या फुलावरचं प्रेम सीमा देव यांच्याशी पहिली भेट घडवून आणण्यात कसं फायदेशीर ठरलं हा किस्सा मला सांगितला होता. आज तो पुन्हा आठवला.

ते म्हणाले होते,''सीमाला मी पहिल्यांदा भेटलो ते ट्रेनमध्ये. मी शूटिंगसाठी फिल्मीस्तानला चाललो होतो. अन् सीमा देखील फिल्मीस्तानला तिच्या कामाच्या निमित्तानं कुणालातरी भेटायला चालली होती. तिनं मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिनं तिच्या आईला माझी ओळख सिनेमातला खलनायक अशी करून दिली. मी पाहत होतो त्या दोघीही खऱ्या आयुष्यातही मी खलनायकच असेन अशा अविर्भावात माझ्याकडे पाहत होत्या. सीमानं दोन वेण्या घातल्या होत्या आणि केसात माळला होता पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांचा सुगंधीत गजरा. जो माझा जिव्हाळ्याचा विषय,प्रचंड आवडीचा. मी त्या फुलांच्या वासाने मोहित झालो आणि नकळत नेमकं त्या दोघींच्या समोरच्या सीटवर जाऊन बसलो. खरंतर मी सीमाच्या चेहऱ्याकडे पाहिलंही नव्हतं. केवळ ट्रेनमध्ये दरवळणाऱ्या त्या मोगऱ्याच्या वासानं मी तिच्यासमोर जाऊन बसलो. तेव्हा तिच्या आईने रागाने मला विचारले होते,'का हो,इथेच का येऊन बसलात?' तेव्हा मी ही पलटून बोललो,'ट्रेन तुमची आहे का?' बिचाऱ्या त्यावेळच्या माझ्या भावी सासूबाई मूग गिळून गप्प बसल्या.

पण नंतर धम्माल झाली. सीमाला फिल्मीस्तानचा रस्ता माहित नव्हता.पण तिला माहित होतं मी सिनेमात काम करतो म्हणजे मी तिथेच चाललोय. तेव्हा या दोघी माझ्या मागून मागून आल्या थेट फिल्मीस्तानपर्यंत. पण मी ही मुद्दामहून गप्प बसलो. त्यांना येऊ दिलं. कारण सीमानं माळलेल्या त्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा आयता सुगंध मला फिल्मीस्तानपर्यंत छान आनंदात घेऊन गेला''. आज रमेशजींच्या जाण्यानं हा किस्सा पुन्हा का कुणास ठाऊक चटकन आठवला. आज कदाचित ती मोगऱ्याची फुलंही कोमेजतील बहुधा,आपल्यावर निस्सिम प्रेम करणारा चाहता आपल्यापासून दूर निघून गेला म्हणून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT