Tejaswini pandit & Prajakta Mali Instagram
मनोरंजन

'बोल्ड सीन पाहताना मराठी प्रेक्षक...' तेजस्विनी,प्राजक्ता स्पष्टच बोलल्या

'रानबाजार' या सध्या चर्चेतल्या वेबसिरीजनिमित्तानं तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांनी सकाळ डिजिटल टीम सोबत दिलखुलास संवाद साधला.

प्रणाली मोरे

अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार'(Ranbazar) या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे. या मालिकेचा टीझर जेव्हा पहिल्यांदा रिलीज करण्यात आला तेव्हा त्यातील प्राजक्ता माळी(Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit) यांच्या बोल्ड लूकला पाहून साऱ्यांनीच तोंडात बोटं घातली. अर्थात सगळ्या सर्वसामान्य चाहत्यांसाठी तो धक्का होता. त्या दोघींना खूप नावं ठेवण्यात आली. पण यावर सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितनं थेट मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेवर बोट ठेवलं आहे. त्यांनी अनेक उदाहरणं देत मराठी प्रेक्षकाला काही प्रश्न विचारलेयत. अर्थात तेजस्विनी आणि प्राजक्तानं विचारेल्या त्या थेट प्रश्नांना ऐकण्यासाठी,मराठी मानसिकतेला नेमकं त्यांनी नावं ठेवताना काय म्हटलं आहे याविषयी जाणून घेण्यासाठी खाली बातमीत जोडलेली एक्सक्लुसिव्ह मुलाखत नक्की पहा.

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेली ही एक्सक्लुसिव्ह व्हिडीओ मुलाखत नक्की पहा.

बोल्ड(Bold) भूमिका केल्यावर त्या लोकांना आवडतील का याचा विचार मी करत नाही. कारण माझं सगळं काम आवडायला मी काय पैसा आहे? असं मजेशीर उत्तर देतानाच तेजस्विनीनं मराठी प्रेक्षकाला प्रणय प्रसंग करताना कपडे काढतात की नाही असा प्रश्न केलाय. बरं त्यानंतर तिच्याच कडक शब्दात याचं उत्तरही देऊन टाकलं आहे. ट्रोलर्सना फार मनावर घेत नाही पण म्हणून कलाकार म्हणून व्यक्त होताना खूप विचारपूर्वक होते हे सांगायला तेजस्विनी विसरली नाही. तर प्राजक्तानं तर चक्क ट्रोलर्सच्या बाबतीत 'मी निगरगट्ट होणार आहे'. असं थेट म्हटलं आहे. ती म्हणाली,'मी भारताची,महाराष्ट्राची नागरिक आहे. मी मला जे पटत नाही त्याविरोधात बोलणार. पण त्यावर जर कुणी काही भाष्य केलं तर मला फरक पडत नाही. पण आता त्याबाबतीत मी आणखी निगरगट्ट होणार असं बोलत प्राजक्तानं नेमकं काय स्पष्टिकरण दिलं आहे यासाठी बातमीत जोडलेली व्हिडीओ मुलाखत नक्की पहा.

प्राजक्ता माळी आणि तेजस्विनीनं या सिरीजमधील खूप सीन वन टेक का केले आणि कसे शूट केले? त्यातील गिमिक्स यावरही आपलं मत मांडलं आहे. 'रानबाजार' या वेबसिरीजमधून थोडक्यात काय दाखवायचं होतं यावर बोलताना या दोघी म्हणाल्या,'जेव्हा राजकीय खेळी घडते तेव्हा एक सर्वसामान्य माणूस विवस्त्र होत असतो'. हे सांगताना त्यांनी रानबाजार बनवण्यामागचा मूळ उद्देश सांगितला आहे. तेव्हा सकाळ डिजिटलला तेजस्विनी आणि प्राजक्तानं दिलेली ही बिनधास्त,बेधडक व्हिडीओ मुलाखत पहायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT