'Ranbazar' Last Episodes Release On 10th June Google
मनोरंजन

रानबाजार: शेवटच्या दोन भागात काय घडणार? कसा होणार शेवट? जाणून घ्या...

'रानबाजार' या टिझर रिलीजपासूनच चर्चेत असलेल्या वेबसिरीजचे शेवटचे दोन भाग १० जून,२०२२ रोजी रिलीज होत आहे.

प्रणाली मोरे

जेव्हापासून अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार'ची(Ranbazar) घोषणा झालीये, तेव्हापासूनच या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा होतेय. त्यात तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचा लूक समोर आल्यानंतर तर या चर्चांना अधिकच उधाण आले. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेबसीरिजची 'असंच काहीसं घडलं होतं... कदाचित ?!' ही टॅगलाईनच बरेच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे 'रानबाजार'च्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.('Ranbazar' Last Episodes Release On 10th June)

वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेबसीरीजचे(Webseries) प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या दोन भागांमध्ये दडलेली आहेत.

आजवर वेबविश्वात कधीही न पाहिलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ही वेबसीरिज आहे. आजवरची भारतातील ही सर्वोत्तम सीरिज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 'रानबाजार'च्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर येऊन थांबलाय, जो आपल्याला पुढील भाग पाहण्यास प्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक क्षणी आपली उत्कंठा वाढवणारी ही वेबसीरिज आहे. पहिल्याच भागात राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची हत्या झाल्याचे दिसत आहे. ही हत्या कोणी केली? हा हनी ट्रॅप आहे की, या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे? या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार आहे?

रत्ना (प्राजक्ता माळी) (Prajakta Mali) आयेशाला का आसरा देते? चारुदत्त मोकाशी ( अभिजित पानसे) या सर्व प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात यशस्वी होणार का? मुख्यमंत्रीपदी कोण येणार? सत्तापालट होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा पुढील दोन भागांत होणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती अखेरच्या दोन भागांची. मुख्यमंत्री सतीश नाईक ( मोहन आगाशे), सयाजी पाटील ( मोहन जोशी), पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्प्पा (मकरंद अनासपुरे), निशा (उर्मिला कोठारे), युसूफ पटेल ( सचिन खेडेकर), इन्स्पेक्टर पालांडे (वैभव मांगले), रावसाहेब यादव ( अनंत जोग) , प्रेरणा सयाजीराव पाटील ( माधुरी पवार) या सर्वांनीच आपापल्याभूमिका अगदी चोख पार पाडल्या आहेत.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि रावण फ्युचर प्रॉडक्शनने रानबाजार'ची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT