Ranbir Kapoor News esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: जुळं होणार! रणबीर घसरला, चाहत्यांनी हेरलं

रणबीर - आलियानं गुड न्युज दिली आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor: रणबीर - आलियानं गुड न्युज दिली आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे. त्याविषयी कुणी काहीही कमेंट देताना दिसत आहे. दस्तुरखुद्द अभिनेता रणबीरनं अशीच एक कमेंट केली आणि ती आता चांगलीच वादात सापडल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही (Bollywood Actor Ranbir Alia) दिवसांपासून आलिया - रणबीर सोशल मीडियावर मोठया प्रमाणात चर्चेत आले आहेत. आलियानं आपण प्रेग्नंट असल्याचे सांगत चाहत्यांना खुशखबरी दिली होती. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतूकाचा (Entertainment News) वर्षाव केला होता. काहींनी या दोन्ही सेलिब्रेटींना ट्रोलही केले होते. सध्या रणबीर आलिया त्यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

एका मुलाखतीमध्ये रणबीरनं आपल्या होणाऱ्या मुलांविषयी जी प्रतिक्रिया दिली (Social Media News) त्याची चर्चा होताना दिसत आहे. वास्तविक त्यानं गंमतीनं केलेलं ते विधान होतं. मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांना सेलिब्रेटींना ट्रोल कऱण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं ठरतं हे यानिमित्तानं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील आलियाला तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाळंतपणाचे स्टंट करत असल्याचे म्हणून तिला हिणवण्यात आले होते. तर काही बहाद्दरांनी त्यांच्या लग्नाला झालेले दिवस आणि आलियाच्या गुड न्युजचा दिवस मोजत हे सगळं प्री प्लॅनिंग असल्याची टीका केली होती.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रची उत्सुकता आता वाढली आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे केसरिया देखील प्रदर्शित झाले आहे. अयान मुखर्जी सोबत रणबीरनं लाईव्ह चॅट केलं आहे. त्या सगळ्या गोष्टी आता समोर आल्या आहेत. त्यात रणबीरनं आपल्या होणाऱ्या बाळाविषयी जी गोष्ट सांगितली त्यावरुन त्याला ट्रोत केले जात आहे. रणबीरनं इ टाईम्सला सांगितलं की, आलियाशी लग्न करण्यापूर्वी आपण पालक होण्याचं प्लॅनिंग करत होतो. मी माझ्या मुलाला ट्रेकिंगला देखील घेऊन जाणार आहे. यावेळी रणबीरनं दिलेल्या एका प्रतिक्रियेवरुन फॅन्सनं असा अंदाज बांधला की त्याला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे.

रणबीरचा समशेरा नावाचा चित्रपटही लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरनं सांगितलं की, मला जुळी मुलं असून मी आता एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग होणार आहे. मी कामातून मोठा ब्रेक घेणार असल्याचेही त्यानं यावेळी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT