THIS is how Ranbir Kapoor introduced Alia Bhatt to his family after their varmala ceremony  Google
मनोरंजन

Video Viral: रणबीर-आलियाचा लग्नातील 'वरमाला समारंभ' पाहिलात का?

रणबीर-आलियाच्या लग्नानंतरही त्यांचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत,त्यांच्या चाहत्यांसाठीही ही मोठी मेजवानी आहे.

प्रणाली मोरे

रणबीर(Ranbir Kapoor) आणि आलियानं(Alia Kapoor) लग्न केल्यामुळे अनेक मुला-मुलींचं 'हार्टब्रेक' झालं आहे. लग्नात दोघंही एखाद्या राजकुमार-राजकुमारीसारखे शोभून दिसत होते. १४ एप्रिल २०२२ रोजी दोघांनी मुंबईतील आपल्या 'वास्तू' इमारतीतील घरात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही व्हायरल होताना दिसत आहेत. आता रणबीर-आलियाच्या लग्नातील खूप छोट्या-छोट्या गोष्टी त्यामुळे चाहत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. आता तर चक्क लग्नातील 'वरमाला समारंभ' व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या समारंभानंतर रणबीरनं एका हटके अंदाजात आलियाची आपल्या कुटुंबाला ओळख करुन दिलेली दिसत आहे. या व्हिडीओची लिंक आम्ही बातमीत जोडलेली आहे. या व्हिडीओत,रणबीर-आलियानं एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्यानंतर चक्क तिला सर्वांसमोर किस केलेलं दिसत आहे. लग्नाला उपस्थित असलेले कुटुंबिय आणि आप्तेष्ट तसंच मित्र-परिवार यांनी लग्नाचा तो माहौल रंगलेला दिसत आहे. रणबीरनं आलियाचा हात हातात घेऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाला उद्देशून म्हणतो,''माझ्या पत्नीला हॅलो म्हणा''. आलिया खूप छान लाजतानाही दिसते आहे त्या व्हिडीओत. अर्थात रणबीरनं ओळख करुन दिल्यावर ती देखील 'हाय' म्हणून सर्वांना संबोधित करते.

आलियानं रणबीरसोबत लग्न झाल्यावर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे काही खास फोटो शेअर केले होते. तिनं लिहिलं होतं,''आमच्या कुंटुबिय आणि मित्र-परिवाराच्या सान्निध्यात आम्ही आमच्या घरातील प्रिय जागी लग्नबंधनात अडकलो आहोत. गेल्या पाच वर्षात आम्ही खूप आठवणी जोडल्या आहेत. प्रेम,हसू,आनंद,शांतता,सिनेमा पाहत जागवलेल्या रात्री आणि बरंच काही. आलियानं लग्नानंतरच्या त्या पोस्टमध्ये आपल्या मनातील भावना खूप सुंदर शब्दात मांडल्या होत्या.

आलिया-रणबीरन लग्न झाल्यावर हनिमूनला न जाता कामात बिझी राहण्याला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आपल्याला अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात दिसणार आहेत. येत्या ९ सप्टेंबर,२०२२ रोजी 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आलिया सध्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तख्त' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तर रणबीर कपूर 'अॅनिमल','लव्ह रंजन' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त दिसला. त्याच्या या सिनेमाच्या शूटिंग सेटवरचे काही फोटो लीक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बारामतीत अपक्षांचा बोलबाला, माळेगाव नगरपंचायतीत अपक्ष उमेदवारांची सरशी

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

SCROLL FOR NEXT