ranbir alia wedding photo  sakal
मनोरंजन

पाहा रणबीर आलियाच्या लग्नाचा अल्बम, कोण आहेत वऱ्हाडी ? कसा होता थाट?

गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया(Alia Bhatt)-रणबीर(ranbir Kapoor)चं लग्न अखेर पार पडलं. दोघांचे लग्नातले हे खास फोटो..

नीलेश अडसूळ

Ranbir Alia Wedding : गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया(Alia Bhatt)-रणबीर(ranbir Kapoor)चं लग्न अखेर पार पडलं. आपले हे आवडते स्टार्स लग्नात कसे दिसत असतील याची प्रतिक्षा अखेर संपली. दोघांचे लग्नातले फोटो अखेर झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल झाले.या विवाह सोहळ्यातील रणबीर कपूर आणि आलिया कपूर यांचा खास अंदाज, वऱ्हाडी मंडळींचा थाट आणि लग्नाचा झगमगाट दाखवणारा हा खास अल्बम...

गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया रणबीरचं लग्न अखेर पार पडलं.
रणबीर आलिया यांनी मोठ्या उत्साहात सप्तपदी पूर्ण केल्या.
यावेळी रणबीर आणि आल्याने पांढऱ्या रंगांचे, सोनेरी नक्षीकाम असलेले कपडे परिधान केले होते.
आलियाच्या निरागस हास्याकडे पाहून घायाळ झालेला रणबीर काय बरं म्हणत असेल...
तेरा साथ ना छोडेंगे.. म्हणणारा हाच तो क्षण...
नीतू कपूर यांची यांची लेक रिद्धीमा कपूर साहनी, जावई भरत साहनी यांचा खास फोटो
कपूर घरातील सर्व मुली या विवाहाच्या निमित्ताने एकत्र आल्या. करिष्मा कपूर, करीना कपूर, रिद्धिमा कपूर यांनी हा खास फोटो शेअर केला आहे.
रणबीरची बहिणी रिद्धिमा कपूर आणि आलियाची आई सोनी राजदान यांचे हे खास क्षण.
रणबीर याने आपले मोठे चुलते रणधीर कपूर यांचेही आशीर्वाद घेतले.
या विवाहाला उद्योजक मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि स्नुषा श्लोक अंबानी यांनी हजेरी लावली होती.
हा विवाह मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत रणबीरच्या वांद्रे येथील 'वास्तू' या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात झाला.
दिग्दर्शक करण जोहर आणि आलिया रणबीरचा जिव्हाळा सर्वांनाच ठाऊक आहे, या लग्नाला करणही आवर्जून उपस्थित होता.
आलिया आज रणबीरशी विवाह करून कपूर घराण्याची सदस्या बनली, त्यामुळे विवाहानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन हा फॅमिली फोटो क्लिक केला आहे.
लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील हा फोटो बराच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT