Ranbir Kapoor, Alia Bhatt receive a gold-plated bouquet from Surat jeweller before wedding.
Ranbir Kapoor, Alia Bhatt receive a gold-plated bouquet from Surat jeweller before wedding.  Instagram
मनोरंजन

Ranbir Alia wedding:दोन माणसांना उचलावा लागेल एवढा मोठा सोन्याचा बुके गिफ्ट

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)यांचं लग्न सध्या चर्चेत आहे. मीडियाच्या प्रत्येक बातमीपत्रात सध्या हेडलाईन असते ती या दोघांच्या लग्नाच्या नवीन अपडेट्सची. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करीत असलेलं हे कपल कधी लग्न करतंय याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. फायनली आता त्यांचं लग्न होत आहे. रणबीर कपूरच्या बान्द्रा येथील वास्तू इमारतीत या दोघांचं लग्न आहे. या दोघांच्या लग्नसाठी केवळ त्यांचे कुटुंबियच नाहीत तर चाहते किती उत्सुक आहेत हे सोशल मीडियावरही दिसून येत आहे.

या दोघांच्या सूरतमधील एका चाहत्यानं एक स्पेशल गिफ्ट यांना लग्नानिमित्तानं पाठवलं आहे. जे पाहून कदाचित डोळ्यांच्या भूवया नक्कीच उंचावतील. काय आहे एवढं ते स्पेशल गिफ्ट जाणून घ्यायची उत्सुकता आता असेल न तुम्हाला. आजपासून रणबीर-आलियाच्या विवाहसोहळ्यांना सुरुवात झाली आहे. आणि आजच हे मोठं गिफ्ट त्यांच्या चाहत्यानं पाठवलंय. हा एक चक्क सोन्याचा मुलामा चढवलेला फुलांचा बुके आहे. आणि हे सोनं देखील २४ कॅरेट गोल्ड आहे बरं का. हे गिफ्ट सुरतमधील एका ज्वेलरने रणबीर-आलियाला पाठवलं आहे.

रणबीर-आलियाच्या विवाहसोहळ्यांना सुरवात होण्याआधी गणेश पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर मेहेंदी सोहळा रंगणार आहे. हे लग्न पारपंरिक पंजाबी पद्धतीनं पार पडणार आहे. मुंबईत रणबीरच्या घरी 'वास्तु' इमारतीत लग्न पार पडल्यानंतर कुलाबा येथील ताज हॉटेलमध्ये बॉलीवूडकरांसाठी रीसेप्शन सोहळा रंगणार आहे. आलिया-रणबीर पहिल्यांदा 'ब्रह्मास्त्र' या अयान मुखर्जीच्या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र स्क्रीनही शेअर करताना दिसणार आहेत. या वर्षी ९ सप्टेंबरला 'ब्रह्मास्त्र' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT