Ranbir alia First photo from wedding Google
मनोरंजन

नांदा सौख्य भरे! आलिया-रणबीरच्या लग्नाचे खास फोटो

आलिया-रणबीरचं लग्न आज १४ एप्रिल २०२२ रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं.

प्रणाली मोरे

गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया(Alia Bhatt)-रणबीर(ranbir Kapoor)चं लग्ना अखेर पार पडलं. आपले हे आवडते स्टार्स लग्नात कसे दिसत असतील याची प्रतिक्षा अखेर संपली. दोघांचे लग्नातले फोटो अखेर झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल झाले. पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचं कॉम्बिनेशन असलेला लेहेंगा,गळ्यात मोगऱ्याचा हार अन् भरजरी ज्वेलरी यात आलिया नव्या नवरीच्या रुपात शोभून दिसतेय. तर रणबीरही याच कॉम्बिनेशनच्या पेहरावात राजबिंडा दिसत आहे, लग्नाचं तेज आणि सुख दोघांच्याही चेहऱ्यावर झळकताना दिसलं,. आलियानं स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास मेसेज शेअर करीत लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि बॉलीवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा गेले अनेक दिवस बी टाऊनमध्ये रंगल्या होत्या. अखेर आता दोघांनीही एकमेकांचे जीवनसाथी बनण्याचे निश्चित केले.आज रणबीरच्या पाली हिल येथील वास्तू या निवासस्थानी दोघांनीही लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरमध्ये गेले अनेक वर्षांची मैत्री होती. 2015 पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. मात्र दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली न्हवती. मात्र सोनम कपूरच्या लग्नात दोघेही उघडपणे मीडियासमोर आले. आणि तेव्हापासून यांच्या रेलशनशिपच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु झाल्या. आणि आज अखेर दोघे ही सप्तपदी घेऊन एकमेकांचे जीवनसाथी बनले.

आज सकाळी रणबीर कपूरच्या वास्तू या निवासस्थानी हळद आणि मेहंदीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी दोन्ही कुटूंबातील नातेवाईक मंडळी आणि मित्र परिवार हजर होते. काल रात्री मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम पार पडला तर हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला. मेहंदी सोहळ्यामध्ये करिना कपूर,करिश्मा कपूर,सैफ अली खान, करण जोहर या कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. तर आज सकाळी हळदी समारंभाला कपूर आणि भट्ट कुटुंब देखील सामील होते. आलिया आणि रणबीरचे लग्न पंजाबी पद्धतीने झाले. दुपारी 2 ते 3 च्या सुमारास या क्युट कपलने लग्न गाठ बांधली. लग्नात या वर वधूने सब्यसाचीने डिझाइन केलेले कपडे घातले आहेत. दोघेही पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात दिसले

प्रत्येक लग्नात जसं वर वधूला पाहण्याची उत्सुकता असते तसंच उत्सुकता लग्नातील शाही भोजनाची असते. रणबीर आलियाच्या विवाह सोहळ्यात दिल्लीहून शेफ बोलावण्यात आले आहेत.यावेळी लग्नाच्या मेन्यूमध्ये शाही पनीर, बिर्याणी,चिकनचे काही पदार्थ, मटण, दाल मखनी, पनीर टिक्का आणि तंदुरी डिश असा काही खासखाद्यपदार्थांचा बेत होता. आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर, जोया अख्तर, संजय लीला भंसाली, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता,मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन, अर्जुन कपूर आणि शाहरुख खान,मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन, अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि शाहरुख खान,शक्ती कपूर,दिग्दर्शक अयान मुखर्जी या कलाकार मंडळीनी आलिया रणबीरच्या खास लग्न सोहळ्यात हजेरी लावली.

16 एप्रिलला रणबीरच्या वास्तू या निवास्थानी त्यांच्या ग्रँड लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देण्यात येणार आहे. यासंह अनेक सेलिब्रेटीनी या नव्या वर वधूला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT