Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding Anniversary Esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'आलियासाठी मी चांगला नवरा नाही..', रणबीरनं नात्याबद्दल केला होता खुलासा

Vaishali Patil

Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding Anniversary: ​​बॉलीवूडचे स्टार कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. लग्न झाल्यापासूनच ही जोडी त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आलिया नेहमी सोशल मिडियावर तिचे आणि रणबीरचे काही फोटो शेअर करत असते. तिच्या चाहत्यांनाही या जोडप्या बद्दल जाणुन घेण्याची उत्सूकता असते.

आज आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. या जोडीचे चाहते अनेकदा त्यांच्याशी संबंधित प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून असतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा मुलाखतीदरम्यान आलिया आणि रणबीरला एक प्रश्न नेहमीच विचारला जाते की लग्न आणि राहाच्या येण्यानंतर त्याचं आयुष्य किती बदलले आहे. या प्रश्नावर नेहमीच रणबीरने त्याचं स्पष्ट मतं मांडले आहे.

जरी रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही. आलियासोबत लग्नानंतरही त्याने बराच काळ त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. पण काळाच्या ओघात आता कलाकारांनी त्यांच्या लग्न आणि मुलीबद्दल मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली आहे. रणबीरने अलीकडेच आलियासोबतच्या त्याच्या लग्नाबद्दल आणि तो स्वतःला कोणत्या प्रकारचा नवरा समजतो याबद्दल बोलला.

रणबीर कपूरच्या म्हणण्यानुसार, त्याला वाटते की तो अधिक चांगला प्रयत्न करत आहे. पण त्याच आयूष्य असं आहे की ते कधीही परिपूर्ण होणार नाही. तो एक ग्रेट मुलगा किंवा ग्रेट पती आहे किंवा भाऊ आहे असं त्याला मुळीच वाटत नाही . पण त्याला असा विश्वास आहे की त्याला चांगलं बनण्याची इच्छा आहे आणि तो चांगला बनेल. तो योग्य मार्गावर आहे. म्हणजेच तो स्वत:ला एक चांगला नवरा बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असंही त्याने सांगितलं.

आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या मुंबईतील वास्तू येथे लग्न केले होते. जिथे मोजक्याच लोकांना बोलावले होते. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच आई-वडील झाल्याची बातमी शेअर केली होती. आता हे जोडपं एका मुलीचे पालक आहेत.त्याच्या मुलीच नावं राहा आहे. रणबीर शेवटचा 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर आलिया भट्टकडेही अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ज्यामध्ये त्याच्या हॉलिवूड प्रोजेक्टचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT