The Thumka Song Esakal
मनोरंजन

The Thumka Song: अरे जरा हळू तिची कंबर लचकेल! रणबीर-श्रद्धाला पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघही त्याच्या आगामी चित्रपट 'तू झुठी में मक्कार' सिनेमामुळं चर्चेत आहे. या चित्रपटाची दोन गाणी रिलीज झाली ज्याला प्रेक्षकांनी खुप डोक्यावर घेतलं. आता या सिनेमाचं 'शो मी द ठुमका' हे गाणं नुकतच रिलिज झालं.

साडेतीन मिनिटांच्या या गाण्यात रणबीरला नाचताना पाहून तुम्हाला 'ये जवानी है दीवानी' हे गाणे नक्कीच आठवेल. तर दुसरीकडे श्रद्धा तिच्या सडपातळ कंबरेने सर्वांना वेड लावताना दिसत आहे. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली श्रद्धा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे गाणे सुनिधी चौहान आणि शाश्वत सिंग यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत.

आता या गाण्याला नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया येतांना दिसत आहे. एकीकडे चाहत्यांना त्यांची जोडी खुप आवडत आहे तर दुसरीकडे या गाण्याच्या डान्स स्टेपमुळं वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. यात रणबीर श्रद्धाला पकडून डान्स स्टेप करत आहे. ही स्टेप पाहिल्यानंतर नेमकं दोघांना करायचं काय आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. काहींनी गाण्याच्या कोरियोग्राफरलाही चांगलचं सुनावलं आहे. काही नवं करण्याच्या नादात जे आहे तेही बिघडलं आहे असंही नेटकरी म्हणतं आहे.

यापूर्वी या चित्रपटातील 'प्यार होता कई बार' हे गाणे रिलीज झाले होते. या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि आयशा रझा मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तू झुठी मैं मक्कर मधून स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीही पदार्पण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT