Ranbir Kapoor Animal Movie Actress Trisha Krishnan  esakal
मनोरंजन

Animal Trisha Krishnan : साऊथच्या त्रिशानं रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'चं केलं कौतुक, नेटकऱ्यांनी काढला जाळ!

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डीचा अॅनिमल प्रदर्शित झाला आणि वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Animal Movie Actress Trisha Krishnan : साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डीचा अॅनिमल प्रदर्शित झाला आणि वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. अशातच काही सेलिब्रेटींनी रणबीरच्या या चित्रपटाचं केलेलं कौतुक अनेकांच्या चर्चेचा अन् टीकेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही लिओ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर त्याच चित्रपटातील एका मन्सूर अली खान नावाच्या अभिनेत्यानं तिच्यावर आक्षेपार्ह शब्दांत पोस्ट केल्यानं त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्रिशानं केली होती. तिच्या या मागणीला प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांनी देखील पाठींबा दिला होता.

Healthy Homes का वाढते आहे आरोग्यपूर्ण घरांची मागणी?

आता त्रिशा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिनं अॅनिमलचं कौतुक केल्यामुळे. तिनं इंस्टावर केलेली पोस्ट नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियेचा विषय झाला आहे. त्रिशानं अॅनिमलचं समर्थन करावं हे अनेकांना आवडलेलं नाही. तिनं म्हटलं आहे की, कल्ट...पापा....अशा शब्दांत त्रिशानं आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मात्र तिच्यावर नेटकऱ्यांनी जी आगपाखड केली त्यामुळे तिला ती पोस्ट डिलिट करावी लागली आहे.

Ranbir Kapoor Animal Movie

रणबीरच्या त्या चित्रपटानं प्रेक्षकांची जेवढी पसंती मिळवली आहे तेवढ्याच प्रमाणात तो ट्रोलही झाला आहे. त्यातील हिंसा, त्याचे केले जाणारे समर्थन, काही प्रसंग यामुळे नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल केले आहे. दिग्दर्शकाला त्या चित्रपटातून काय सांगायचे आहे हेच कळलं नाही. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रणबीरवर आगपाखड केली आहे.

रणबीरच्या अॅनिमलनं तीन दिवसांत दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. देशभरातून त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. रणबीर पहिल्यांदाच एवढ्या हिंसक पद्धतीनं एखाद्या चित्रपटातून समोर आल्यानं त्याच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. रेड्डीनं एका वेगळ्या विषयाची मांडणी करुन शंभर टक्के मनोरंजनाची हमी देणारी कलाकृती सादर केली आहे. अशाही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

अखेर त्रिशाला नेटकऱ्यांचा वाढणारा विरोध यामुळे तिला तिची पोस्ट डिलिट करावी लागली आहे. तिनं अॅनिमलचं कौतुक करावं, त्याविषयी लिहावं हे नेटकऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना आवडलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT