Alia Bhatt Gift Esakal
मनोरंजन

Alia Bhatt Gift: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रणबीरनं आलियाला दिलं 'इतक्या' लाखांचं गिफ्ट! व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचे स्टार कपल आलिया आणि रणबीर कपुर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचे स्टार कपल आलिया आणि रणबीर कपुर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकताच या जोडप्याने त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

अनेक कलाकरांनीही त्यांच यानिमित्त अभिनंदन केले आहे. त्यादिवशी आलिया आणि रणबीर त्याच्या नव्या घराच्या बांधकाम सुरु असलेल्या जागी स्पॉट झाले. त्यानंतर त्यांनी पापाराझींना पोजही दिली. मात्र यावेळी त्यांनी कॅमेऱ्यासमोर एकमेंकाना किस केल्याने त्यांना ट्रोल केले गेल होतं. ज्याची सोशल मिडियावर बरिच चर्चा रंगली.

मात्र आता सोशल मिडियावर आणखी दुसऱ्या गोष्टीची चर्चा रंगली आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रणबीर पत्नी आलियासोबत एक दिवसासाठी मुंबईत परतला. विशेष म्हणजे, रणबीरचा एअरपोर्ट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो पिंक चॅनेल स्लिंग बॅग घेऊन जाताना दिसला. मुंबईला परतताना रणबीर कपूर हातात बॅग घेऊन दिसला.

त्याने आलिया भट्टसाठी लंडनमधून चॅनेल बॅग खरेदी केली होती. त्यानंतर आलिया आणि रणबीर त्यांच्या नवीन घराच्या बांधकाम साइटला भेट देताना दिसले आणि आलियाने तीच गुलाबी चॅनेल स्लिंग बॅग घेतली.

या बॅगची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. रणबीरने विमानतळाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी या गिफ्ट बद्दल अंदाज लावला. त्यानंतर सोशल मिडियावर पुन्हा आलिया आणि रणबीरची चर्चा रंगली.

दरम्यान लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आलियाने तिच्या लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले ज्यात आफ्रिकेत रणबीर तिला प्रपोज केल्याचा आणि त्याच्या हळदीच फोटो दिसले. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणबीर 'एनिमल'च्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाला. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. दुसरीकडे, आलियाकडे रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT