saurabh shukla, ranbir kapoor SAKAL
मनोरंजन

Ranbir Kapoor ने दिली ३० हजाराची रम आणि त्यांनी दिली old monk, सौरभ शुक्लाचा भन्नाट किस्सा

रणबीर कपूरने सिनेमाच्या सेटवर नागार्जुनने दिलेली ३० हजाराची रम आणली

Devendra Jadhav

Ranbir Kapoor - Saurabh Shukla News: दारू हि अशी गोष्ट आहे कि जी मित्रांची मैफिल जमवते. गप्पांचा माहोल निर्माण करते. वयाचं बंधन विसरायला लावते. आणि सर्वांना समान पातळीवर आणते.

दारू संबंधित असाच एक भन्नाट किस्सा सौरभ शुक्ला यांच्या आयुष्यात घडला. सौरभ शुक्ला म्हणजे बॉलिवूडमधला कल्लू मामा. सौरभ यांचा हा किस्सा घडला घडला तो बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सोबत. काय घडलंय बघूया..

(Ranbir Kapoor gave me 30k rum and I gave him Old Monk, said Saurabh Shukla)

रणबीर कपूर आणि सौरभ शुक्ला यांनी बर्फी, जग्गा जासूस, शमशेरा अशा सिनेमात एकत्र अभिनय केलाय. एका सिनेमाच्या सेटवर सौरभ शुक्ला यांना रणबीर कपूरने ३० हजाराची रम ऑफर केली.

ती रम रणबीरला ब्रम्हास्त्रच्या सेटवर नागार्जुन यांनी ऑफर केलेली. रणबीर आणि सौरभ शुक्ला दोघे लेह ला एकत्र सिनेमाचं शुटिंग करत होते तिथे हा किस्सा घडला.

सौरभ अनेकदा ओल्ड मॉंक पितात. ओल्ड मॉंक हि सहज उपलब्ध होणारी सर्वात स्वस्तातली दारू आहे असं त्यांचं मत आहे. रणबीर कपूरने सिनेमाच्या सेटवर नागार्जुनने दिलेली ३० हजाराची रम आणली. बॉटल थोडी रिकामी होती.

त्यामुळे सौरभ शुक्ला रणबीरला म्हणाले,"काय मित्रा, रिकामी बॉटल देतोस प्यायला" पुढे जेवढी होती तेवढी ३० हजाराची रम त्यांनी दोघांमध्ये संपावली.

दोघांना दारू कमी पडली. मग रणबीरला सौरभ शुक्ला म्हणाले ओल्ड मॉंक आहे माझ्याकडे.. पिणार का? रणबीरने होकार दिला. आणि मग दोघांनी मनसोक्तपणे ओल्ड मॉंकचा आस्वाद घेतला.

अशाप्रकारे महागातली रम पिणाऱ्या रणबीरला सौरभ शुक्ला यांनी रम ऑफर केली. रणबीरने सुद्धा नाकं न मुरडत ओल्ड मॉंकचा उपभोग घेतला आणि सौरभ शुक्ला सोबत मैफिल जमवली. रणबीर कपूर लवकरच तू झुठी मैं मक्कार आणि ऍनिमल या आगामी सिनेमांमध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: तरुणपणी प्रेयसीवर चाकूने वार करुन गायब झाला; तब्बल ४८ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात 'असा' अडकला

Nashik Jail Video : बघू ते नवलच! नाशिकच्या जेलमध्ये कैद्यांनी केली गांजा पार्टी; धक्कादायक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

UP: सीएम योगींची गर्जना! मुलींच्या सुरक्षेशी खेळ केला, तर पुढच्या चौकात यमराज तयार उज्ज्वला योजनेतून महिलांना मोठं गिफ्ट

Ishan Kishan Century: १५ चौकार, ६ षटकार! कर्णधार इशान किशनचे थोडक्यात हुकले द्विशतक, टीकाकारांना दिले उत्तर...

बँकेच्या चुकीने UPSCची मुख्य परीक्षा हुकली, SBI तरुणाला देणार ७ लाखांची भरपाई; काय घडलं?

SCROLL FOR NEXT