Ranbir Kapoor Google
मनोरंजन

आग्र्यात 'ताजमहल' पाहताना रणबीर सोबत आलिया नाही,मग 'ती' दुसरी कोण?

अभिनेत्याचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला अन् चर्चा रंगू लागली.

प्रणाली मोरे

सध्या बाॉलीवूड(bollywood) मधलं 'लव्हेबल कपल' म्हणून रणबीर(Ranbir Kapoor)-आलिया(Alia Bhatt) कडे पाहिलं जातं. रणबीर-आलिया सध्या लीव्ह-इन मध्ये राहत आहेत. 'ब्रम्हास्त्र 'या त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं त्यांच्यात वाढलेली जवळीक सगळ्यांनीच पाहिली असेल. या दोघांमधील नात्यामुळे कपूर-भट कुटुंबियही आता जवळ आले आहेत. एकेमेकांच्या कुटुंबातील कार्यक्रमांना ते उपस्थिती दर्शवताना आपण पाहिलं असेल कदाचित. आलिया अर्धी सूनबाई झालीच आहे आता कपूर परिवाराची पण आता सगळेच, म्हणजे या दोघांचे चाहतेही वाट पाहत आहेत कधी एकदा यांच्या डोक्यावर अक्षता पडतायत. पण आता एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,त्याची चर्चा होऊ लागलीय. रणबीरवर सगळे संशय घेऊ लागलेयत? रणबीरनं पुन्हा चीटींग केलं का आलियासोबतही अशा चर्चा रंगू लागल्यात. कोणता फोटो आहे बरं तो,ज्यानं एक नवा वाद निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे.

तर हा फोटो अर्जून कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यात रणबीर दिसत आहे आणि सोबत हॉटेलच्या खिडकीतून पांढराशुभ्र,प्रेमाचे प्रतिक असणारा 'ताजमहल' रुबाबात उभा दिसतोय. आता या फोटोवरुन तर कळतंय की रणबीर आग्र्यात आहे. आणि सोबत अर्जून कपूर आहे. तर चाहत्यांनो चिंता नसावी. रणबीरनं आलियाला चीट केलेलं नाही. तर तो अर्जून कपूर सोबत आग्र्यात आहे. या फोटोला अर्जूननं धमाल कॅप्शन दिलं आहे.तो म्हणतोय,''जेव्हा रणबीरला माझं आणि ताजमहलचं आकर्षण वाटतं आणि तो चक्क आलियाला न घेता माझ्यासोबत इथे येतो''. त्यानं ही पोस्ट आलियालाही टॅग केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते मात्र खूश आहेत. अभिनेत्री रकुल प्रीतनंही त्यावर कमेंट करीत म्हटलंय,''फायनली तुम्ही दोघांनी ताजमहल पाहिला तर''. तर एका चाहत्यानं म्हटलंय,'मस्त,तू ही पोस्ट आलियालाही टॅग केलीस'.

रणबीर आणि आलिया लवकरच आपल्याला एकत्र त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' या सिनेमात दिसणार आहेत. तर त्यांच्यासोबतच महत्त्वाच्या भूमिकेत अमिताभ बच्चनही आहेत. आलिया सध्या तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तिच्या या सिनेंमावरनं अद्याप वाद सुरू असले तरी तिची भूमिका मात्र प्रेक्षकांचं मन जिंकून जाईल असं नक्कीच वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT