Ranbir Kapoor Propose to alia bhatt-secret photo viral,reveal place? Google
मनोरंजन

रणबीरनं आलियाला कुठे केलेलं पहिल्यांदा प्रपोज?समोर आला 'तो' सीक्रेट फोटो

सोशल मीडियावर सध्या रणबीर-आलिया बाबतची छोट्यातली छोटी गोष्ट सर्च केली जात आहे.

प्रणाली मोरे

आलियानं (Alia Bhatt)जेव्हापासून आपल्या प्रेग्नेंसी(Pregnancy) संदर्भातील पोस्ट शेअर केलीय तेव्हापासून सगळीकडे वातावरण आलियामय झालं आहे. जिकडे-तिकडे रणबीर आलियाच्या लहानपणापासून मोठेपणी पर्यंतच्या अनेक सीक्रेट्सची चर्चा तर कुठे दोघांचे कुतुहलाचे विषय तर अगदी आता व्हायरल होतोय रणबीरनं(Ranbir Kapoor) आलियाला केलेल्या सीक्रेट प्रपोजचा एक फोटो. इंटरनेटवर जो-तो या दोघांच्या अनेक गोष्टी सर्च करताना दिसत आहेत. त्यात यांचे कुटुंबीयही Unseen Photo शेअर करतायत ज्यानं नुसता सोशल मीडियावर दोघांचाच उदो-उदो सुरु आहे. आता आलियाच्या सासुबाईंनी म्हणजे नीतू कपूर यांनी एक फोटो शेअर केलाय ज्यामुळे नेटकरी अनेक अंदाज लावत सुटलेयत. अनेकांच्या मते हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा रणबीरनं आलियाला एका सफारी टूरवर नेऊन प्रपोज केलं होतं.(Ranbir Kapoor Propose to alia bhatt-secret photo viral,reveal place?)

नीतू कपूर यांच्या या फोटो पोस्टवर प्रतिक्रिया देताना आलियानं लिहिलं आहे,''माझा सगळ्यात आवडता फोटो''. या फोटोत रणबीर-आलिया एकमेकांच्या मिठीत अन् सभोवतालच्या विश्वाचा विसर पडल्यागत एकमेकांच्या डोळ्यात आकंठ बुडालेले दिसत आहेत. या फोटोत चाहत्यांनी एक गोष्ट नोटीस केलीय की रणबीरच्या डाव्या हातात एक रींग बॉक्स दिसतोय. तेव्हा थेट एका चाहत्यानं नीतू कपूर यांना प्रश्न विचारुन टाकला आहे, 'हा फोटो रणबीरनं आलियाला रोमॅंटिक प्रपोज केलं तेव्हाचा आहे का?' तर दुसरा चाहता म्हणतोय,'हा फोटो तेव्हाचाच आहे,मला रणबीरच्या हातात रिंग बॉक्स दिसत आहे'. ट्वीटरवर नीतू कपूर यांना चाहत्यांनी हे असे प्रश्न विचारत भंडावून सोडलं आहे.

या फोटोवरुन अंदाज लावला जातोय की साधारण जानेवारी दरम्यानचा फोटो आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आलिया-रणबीर दोघेही आफ्रिकेची सफारी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तिथले त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. पण हा सीक्रेट फोटो मात्र आता समोर आला आहे. याच जंगल सफारी दरम्यान रणबीरनं आलियाला लग्नासाठी प्रपोज केलं,अन् तेव्हाच लग्नाचा मुहूर्त ठरला असणार असा देखील अंदाज लावला जात आहे.

रणबीर आणि आलिया खरंतर भेटले 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या सेटवर. आणि तिथूनच सुरू झाली दोघांची प्रेमकहाणी. अन् १४ एप्रिल २०२२ ला दोघं लग्नबंधनात अडकले. आता ज्या सिनेमानं दोघांना आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT