Celebs Attended Ex Wedding Sakal
मनोरंजन

Celebs Wedding: रणबीर कपूरपासून अनुष्का शर्मापर्यंत, या बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या एक्सच्या लग्नाला लावली हजेरी

बॉलीवूडचे असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे केवळ त्यांच्या एक्सचे मित्रच नाहीत तर त्यांच्या लग्नालाही आनंदाने उपस्थित राहिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ते दिवस गेले जेव्हा लोक त्यांचे संबंध संपवून त्यांच्या एक्ससोबतचे सर्व नाते तोडायचे. बॉलीवूडचे असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे आज, विभक्त असूनही, त्यांचे एक्ससोबत चांगले बॉन्ड आहे. केवळ ते एक्सचे मित्रच नाहीत तर ते त्यांच्या लग्नालाही आनंदाने उपस्थित राहिले आहेत.

डिनो मोरिया आणि बिपाशा बसू हे एकेकाळी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. 'राज' कपल 1996 ते 2002 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते.

नंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले. डिनो आणि बिपाशा एकमेकांचे चांगले मित्र राहिले. नंतर बिपाशाने करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले आणि डिनोनेही या जोडप्याच्या लग्नाला आनंदाने हजेरी लावली.

रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही डेट करत होते. रिपोर्ट्सनुसार, त्यांचे नाते चांगल्या नोटवर संपले नाही.

असे असूनही वर्षांनंतरही रणबीरने सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावायला मागेपुढे पाहिले नाही. त्यावेळी अभिनेता आलिया भट्टसोबत सोनमच्या लग्नात सहभागी झाला होता. सोनमने तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले आहे.

Celebs Wedding

रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री दीपानिता शर्माने '16 डिसेंबर' आणि 'जोडी ब्रेकर्स'चा सह-अभिनेता मिलिंद सोमणला डेट केले. जरी त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नसली तरी, पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री त्यांच्या रोमान्सच्या अफवांना चालना देते.

मिलिंदने त्याच्या कथित गर्लफ्रेंड दीपानिता आणि बिपाशा बसूसोबत फ्लॅट शेअर केला होता. मिलिंदने अंकिता कोंवरशी लग्न केले तेव्हा दीपानिता अलिबागमध्ये त्यांच्या लग्नात सहभागी झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओलला डेट करत होता. ते थोड्या काळासाठी रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर त्यांचे ब्रेकप झाले. विभक्त झाल्यानंतरही ते मित्र राहिले.

जेव्हा अहानाने बिझनेसमन वैभव वोहरासोबत लग्न केले तेव्हा रणवीरने त्याची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसोबत त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग काही काळ एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. या जोडीने 'बँड बाजा बारात'मध्ये एकत्र काम केले होते आणि या चित्रपटातील त्यांची धमाकेदार केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मात्र, काही काळानंतर ते वेगळे झाले. ते मित्र राहिले आहेत आणि अजूनही त्यांचे चांगले बॉन्ड आहे. अनुष्का मुंबईत रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाली होती.

Celebs Wedding

शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा 'कमिने'च्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र, शाहिद आणि प्रियंका या दोघांनीही त्यांच्या नात्याला मान्य करणे टाळले. जेव्हा इनकम टॅक्स ऑफिसर प्रियांकाच्या घरी आले आणि शाहिदने दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या रिलेशनच्या अफवा चर्चेत आल्या.

ही बातमी वणव्यासारखी पसरली. मात्र, काही काळानंतर ही जोडी वेगळी झाली. वर्षांनंतर, जेव्हा प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केले, तेव्हा शाहिद त्याची प्रिय पत्नी मीरा राजपूतसह त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT