Ranbir Kapoor wears father Rishi Kapoor’s watch on wedding day Google
मनोरंजन

आठवण! लग्नात रणबीरनं आपलं आवडतं नाही, तर वडीलांचं फेव्हरेट घड्याळ घातलं...

रणबीर कपूरनं लग्नाच्या दिवशी आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला

प्रणाली मोरे

रणबीर कपूरनं(Ranbir Kpoor) लग्नाच्या दिवशी आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. ही जणू त्यानं वडिलांना लग्नाच्या दिवशी वाहिलेली आदरांजलीच होती. रणबीरनं आपल्या वडिलांचं अत्यंत फेव्हरेट असं वॉच आवर्जुन घातलेलं दिसलं. रणबीरनं आयव्हरी आणि गोल्ड रंगाची शेरवानी घातली होती. आणि मनगटात वडिलांचं घड्याळ घातलं होतं. हे घड्याळ ऋषी कपूर(Rishi Kapoor) यांच्या वॉच कलेक्शनमधलं अत्यतं महागडं घड्याळ होतं. ज्याची किंमत २१ लाख रुपये इतकी आहे. तसंच १८ कॅरेट व्हाइट गोल्डची केस आणि निळ्या रंगाचा लेदर बेल्ट असा या घड्याळाचा एकंदरीत लूक होता.

आलिया भट्टनं(Alia Bhatt) देखील लग्नानंतर सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून रणबीरसोबतचे लग्नातले काही खास रोमॅंटिक क्षण शेअर करत सुंदरशा आठवणींची पोस्टही लिहीली होती. आपल्या मंगळसुत्रापासून,रणबीरच्या ८ लकीनंबरचं वेडिंग डेटशी कनेक्शन ते अगदी वेडिंग डेट लग्नाच्या साडीवर रेशमी धाग्यानं एम्ब्रॉयडरी करुन घेईपर्यंत आलियानं देखील सगळंच खास असं आपल्या लग्नात केलं होतं. पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया रणबीरनं पाली हीलवरील आपल्या घरातील बालकनी एरियात लग्नगाठ बांधली.

रणबीरनं जसं वडिलांच्या आठवणीत हातात घड्याळ घातलं होतं तसंच नीतू कपूर यांनी देखील आपल्या हातावरील मेहेंदीत ऋषी कपूर(Rishi kapoor) यांचं नाव लिहिलं होतं. त्यांनी तो फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ऋषी कपूर यांच्या स्मरणात लग्नाच्या दिवशी सकाळी गणेश पूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. नीतू कपूर यांच्या मेहेंदीच्या फोटो पोस्टनंतर आणि रणबीर याच्या हातातील ऋषी कपूर यांचे घड्याळ पाहिल्यानंतर केवळ कुटुंबियच नाही तर ज्यांना ज्यांना हा भावबंध कळला तो प्रत्येकजण आनंदाच्या क्षणीही ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावूक झालेला दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT