Randhir Kapoor will definitely attend Ranbir Kapoor and Alia Bhatt's wedding Google
मनोरंजन

'पुतण्याच्या लग्नात हजेरी लावणार का?'; काका रणधीर कपूर यांनी दिलंय उत्तर

काही दिवसांपूर्वी रणबीरनं आपल्या काकांना स्मृतीभ्रंश झालाय असं म्हटलं होतं,ज्यावर रणधीर कपूर नाराज झाले होते.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) १७ एप्रिल २०२२ रोजी चेंबुर येथील 'आर के हाऊस' मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे. मोजक्याच आप्तेष्टांच्या अन् मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे लग्न पार पडणार आहे असं म्हटलं जात असताना आता सुर उमटतोय की रणधीर कपूर पुतण्याच्या लग्नाला जाणार का? काही दिवसांपूर्वी दिवंगत ऋषि कपूर(Rishi Kapoor) यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शर्माजी नमकीन'च्या स्क्रीनिंग दरम्यान काका रणधीर कपूर(Randhir Kapoor) यांनी ''वडलांना भेटायचंय,बोलाव त्यांना'' असं विचारलं हे सांगताना रणबीरनं रणधीर कपूर यांना स्मृतीभंशाचा आजार झालाय असं मोठं भाष्य केलं होतं.

पण त्यानंतर रणधीर कपूर(Randhir Kapoor) यांनी यावर स्पष्टिकण देताना,'' आपल्याला असा कोणताच आजार झाला नाही,रणधीरला जे वाटतं तो ते बोलतो,यात मी काय करु शकतो'', असं नाराजीच्या सुरात म्हटलं होतं. 'शर्माजी नमकिन' हा ऋषि कपूर यांचा शेवटचा सिनेमा आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात आता तो प्रदर्शित केला गेला आहे. रणधीर कपूर आपल्या पुतण्याच्या बोलण्यावर खूश नाही आहेत अशी चर्चा होती. त्यामुळे आता रणबीरच्या लग्नात काका रणधीर कपूर सहभागी होणार की नाही यावरनं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कळालंय की,रणधीर कपूर आपल्या पुतण्याच्या लग्नाला नक्कीच हजेरी लावणार आहेत.

आलियाची आई सोनी राजदानचे वडिल, म्हणजेच आलियाचे आजोबा खूप आजारी असल्याकारणानं दोन्ही कुटुंबाकडून कुणीही लग्नाविषयी कन्फर्म बोलायला तयार नाही. पण आजोबांना आलियाचं लग्न पहायचं आहे म्हणूनंच खरंतर लग्न तातडीनं करायचा निर्णयही घेतल्याचं बोललं जात आहे. आणि बोललं जात आहे की आलियाही करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या शूटिंगनिमित्तानं मेहेंदीच्या आदल्या दिवशी पर्यंत म्हणजे १२ एप्रिल पर्यंत बिझी आहे. आलिया रणबीर लग्नानंतर लगेचच रीसेप्शन देणार नसून,लग्नात फक्त कुटुंबिय,मित्रपरिवार आणि काही खास लोकांनाच निमंत्रण देण्यात आलंय, जे लग्नसोहळ्यासाठी आहे. बॉलीवूडकरांसाठी आलिया-रणबीर या महिन्याच्या शेवटी रीसेप्शन देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT