Ranu Mandal Viral Video Comment on Lata Mangeshkar fans
Ranu Mandal Viral Video Comment on Lata Mangeshkar fans  esakal
मनोरंजन

Ranu Mandal : 'तुझी लायकी काय बोलते किती', लता दीदींचा एकेरी उल्लेख! नेटकऱ्यांनी आपटलं

सकाळ डिजिटल टीम

Ranu Mandal Video : सोशल मीडियावर काही वर्षांपूर्वी राणू मंडल व्हायरल झाली होती. तेवढ्या काही दिवसांपुरतं का होईना तिच्या आवाजाची भुरळ श्रोत्यांना पडली. त्यानंतर तिला काही रियॅलिटी शोमध्ये देखील बोलावण्यात आले होते. त्यात तिच्या आवाजाला बऱ्यापैकी दाद मिळाली. मात्र यासगळ्यात राणूच्या डोक्यात हवा गेली आणि ती काहीही बरळू लागली असे दिसून आले आहे.

राणूनं आपण काय बोलतो आहोत, कुणाबद्दल बोलत आहोत याचे जराही भान न ठेवता दिलेली प्रतिक्रिया तिला भोवताना दिसत आहे. तिनं साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी राणूची चांगलीच शाळा घेतली आहे. आपण कोण आहोत, आपला आवाज काय याचे भान राणूनं ठेवायला हवं. अशा प्रतिक्रिया तिला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

राणूचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामध्ये तिनं दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचा अपमान केला आहे. त्यानंतर दीदिंच्या लाखो चाहत्यांचा संताप दिसून आला आहे. त्यांनी राणूला चांगलेच झापले आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या राणूला सोशल मीडियावरुन थोडी प्रसिद्धी काय मिळाली तिनं थेट भारतरत्न लता दीदींच्या नावाचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका होत आहे.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये राणू मंडल म्हणते, मी आता जे गाणं गाणार आहे ते कोणत्या लता-फताचे नाही, जिनं कुणी ते गाणं गायलं आहे तिचाही आवाज भारी आहे. त्यानंतर तिनं अगर दुश्मन नावाचे गाणे गाऊ लागते. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या हम किसी से कम नही या चित्रपटातील ते गाणे असून मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid: सिंगापूरनंतर भारतातही परसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

Nigeria Firing: अमानुष! बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात ४० लोक ठार; पीडित म्हणाले, त्यांनी आमची...

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

SCROLL FOR NEXT