Ranveer Singh and Not Karan Johar to Host Bigg Boss OTT 2? Here’s What We Know Google
मनोरंजन

Big boss OTT 2: करण जोहर,रणवीर सिंग नाहीच,भलतीचं नावं होस्ट म्हणून चर्चेत

'Big boss OTT' च्या पहिल्या सिझनला करण जोहरनं होस्ट केलं होतं,ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

प्रणाली मोरे

बिग बॉसचा(Big Boss) प्रत्येक सिझन हा वादांमुळे चांगलाच चर्चेत राहतो. यामुळेच तर बिग बॉसचं ओटीटी(Big Boss OTT 2) व्हर्जन देखील आणण्याचा नवा प्रयोग झाला,ज्याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. गेल्या वर्षीच बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनला Voot वर लॉंच करण्यात आलं. या शो ला बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं(Karan Johar) होस्ट(Host) केले होते. अर्थात होस्ट म्हणून करणने आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला. आता या शो च्या नव्या सीझनची लगबग सुरु झाल्याचं कळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार यावेळी करण जोहर नाही तर हिना खान या शो ला होस्ट करणार आहे. या बातमीमुळे हिना खानच्या चाहत्यांची स्वारी 'सातवे आसमान पर' होती. पण त्यानंतर वेगळंच नाव चर्चेत आलं.

बिग बॉस ओटीटीच्या नवीन सिझनला हिट करण्याच्या हेतूने निर्मात्यांनी कंबर कसली आहे. यावेळी त्यांना कोणतीच रिस्क घ्यायची नाहीय. अनेकांनी दावा केला होता की यावेळी या शो ला करण जोहर नाही तर रणवीर सिंग(Ranveer SIngh) होस्ट करणार आहे. म्हणजे बोललं जात आहे की करण जोहरनं शूटिंगच्या तारखा न दिल्यामुळे होस्ट बदलला जात आहे. त्यामुळे निर्मात्यांना आता करणच्या जागी रणवीर सिंग हवा होता. याआधी खरंतर रणवीरने छोट्या पडद्यावर 'द बिग पिक्चर' नावाचा आणखी एक रिअॅलिटी शो होस्ट केला होता.

पण आता कळतंय की रणवीर देखील आधीच्या काही कमिटमेंट्समुळे बिझी आहे आणि तो देखील हा शो होस्ट करत नाहीय. म्हणून निर्मात्यांनी नवी शक्कल लढवत थेट करण कुंद्रा(Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश या लव्हबर्ड्सना होस्ट म्हणून विचारणा केल्याचे कळत आहे. तसेही या दोघांनी याआधी कंगनाच्या 'लॉकअप' शो मध्ये काही भाग जेलरच्या रुपात होस्ट केला होता,ज्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दोघांना विचारणा झाली असली तरी त्यांनी यावर होकार कळवल्याचं वृत्त अद्याप तरी समोर नाही.

बिग बॉस ओटीटी च्या दुसऱ्या सिझनसाठी निर्मात्यांनी सेलेब्सना ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. बातमी आहे की कांची सिंग,पूजा गौर आणि महेश शेट्टी या बिग बॉस ओटीटी शो मध्ये सामिल होण्यास तयार होऊ शकतात. याव्यतिरिक्त निर्मात्यांनी संभावना शेठ आणि पूनम पांडेशी देखील संपर्क साधला आहे. पण अद्याप या दोघींचाही शो साठी होकार आहे की नकार याविषयी काही बातमी समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT