Ranveer bold Photoshoot  esakal
मनोरंजन

Ranveer Singh: रणवीरचं न्युड फोटोशुट, ते पाहून चाहते आऊट!

बॉलीवूडमधील अतरंगी अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. प्रसिद्धीत राहण्यासाठी तो काय करेल याचा भरवसा नाही.

युगंधर ताजणे

Bollywood Actor Ranveer Singh: बॉलीवूडमधील अतरंगी अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. प्रसिद्धीत राहण्यासाठी तो काय करेल याचा भरवसा नाही. आता त्यानं तर चक्क न्युड फोटोशुट केलं आहे. ते पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या फोटोशुटवर त्याला मिळालेल्या(Bollywood Actress Deepika Padukone) कमेंटस् देखील भन्नाट आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरनं बेयर ग्रिल्सला किस करत वेगळ्याच प्रकारच्या चर्चेला तोंड फोडले होते. बेयर ग्रिल्सच्या वाईल्ड लाईफमध्ये तो सहभागी झाला होता. यावेळी रणवीरला त्याचा अतिउत्साहपणा चांगलाच भोवल्याचे दिसून आले आहे.

रणवीर नेहमीच सोशल मीडियावर ट्रेडिंग असणारा अभिनेता आहे. आता तर न्युड (Ranveer Bold Photoshoot) फोटोग्राफीनं त्याला चर्चेत आणलं आहे. करण जोहरच्या कार्यक्रमात त्यानं केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची पत्नी अभिनेत्री दीपिकाला देखील त्याच्या अशाप्रकारच्या वागण्याचा अनेकदा मनस्ताप झाला आहे. तिनं काही मुलाखतींमध्ये रणवीरच्या अतिउत्साहाला आवरणं कठीण असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर रणवीरचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याच्या एका चाहत्यानं तर अरे बाबा ही कोणत्या प्रकारची फोटोग्राफी अशा प्रकारची कमेंट केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरनं एका मॅगझीनसाठी अशा प्रकारचे फोटोशुट केल्याचे समोर आले आहे. मात्र यावेळी त्यानं जे फोटोशुट केलं आहे ते भलतेच बोल्ड आहे. रणवीर अशाप्रकारचे फोटोशुट करु शकतो यावर त्याच्या चाहत्यांना विश्वास बसलेला नाही. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या रणवीरच्या न्युड फोटोग्राफीनं खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यत या फोटोंना लाखो लाईक्स, हजारो कमेंटस आल्या आहे.

रणवीर त्या फोटोंना कॅप्शन देताना प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण आपलं प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आपल्या अशाप्रकारच्या फोटोंवर दीपिका कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देईल यावरही काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांना मात्र रणवीरचा हा अंदाज भावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Ganpati Visarjan 2025 Live Updates : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जुहू चौपाटीवर निर्माल्य गोळा करण्याचे काम

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT